ठाणे - सोनभद्र हत्याकांडातील मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आज ठाणे जिल्ह्यात महिला काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत उत्तरप्रदेश सरकारचा निषेध केला.
उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी गांधी यांनी बेकायदेशीरपणे अटक केली. यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोस्टरला बांगड्याचा हार घालून त्याला जोड्याने मारत रास्ता रोको आंदोलन केले. तसेच भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून गोळीबार करुन १० जणांची हत्या करण्यात आली होती. या हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केली होती.