ETV Bharat / city

दिड वर्षाने आव्हाडांना अटक अन् सुटका, पहा तक्रारदार करमुसे काय म्हणाले? - etv bharat marathi

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात अटक होऊन जामीन मंजूर झाली. गेले अनेक दिवस न्याय मिळत न्हवता. तसेच, जितेंद्र आव्हाड हे मंत्री असल्याने पोलीस देखील दबावात असल्याचे अनंत करमुसे यांनी म्हटले आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Oct 15, 2021, 7:50 AM IST

ठाणे - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात अटक होऊन जामीन मंजूर झाली. गेले अनेक दिवस न्याय मिळत न्हवता. तसेच, जितेंद्र आव्हाड हे मंत्री असल्याने पोलीस देखील दबावात असल्याचे अनंत करमुसे यांनी म्हटले आहे.

तक्रारदार माहिती देताना

न्यायालयीन लढा लढत राहणार आहे

(5 एप्रिल 2020)रोजी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर अपहरण, मारहाण झाल्याचा गुन्हा वर्तक नगर पोलिसात दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये तीन पोलीस आणि आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा दिवे लावा असे सांगितल्यानंतर आव्हाड यांच्या पोस्टवर करमसे यांनी कमेंट केली त्यानंतर ही घटना घडली. दरम्यान, यापुढेही मी मागे हटणार नाही. न्यायालयीन लढा लढत राहणार आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे असही करमसे म्हणाले.

पोलीस दबावात

गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवस आव्हाड यांना अटक झाली नाही. पोलिसांनी अनेक पोलिसांचे साक्षीदार म्हणून जवाब नोंदवले आहेत. मात्र, असे एका दिवसात अटक होऊन जामीन मिळणे ही दुर्दैवी बाब असल्याचे करमुसे म्हणाले आहेत. याचा अर्थ आपल्याकडे सामन्या माणसाला तुम्ही मारहान करा, तुम्ही मंत्री आमदार असाल तर तुम्हाला काही होत नाही. असा वाईट प्रकार घडत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; किरीट सोमैया ट्वीटमध्ये म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.