ETV Bharat / city

भिवंडीत न्यायाधीशांच्या अंगावर चपला भिरकावणाऱ्या आरोपीला दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

author img

By

Published : Dec 12, 2020, 3:37 PM IST

Updated : Dec 12, 2020, 5:26 PM IST

आरोपी अशरफ अन्सारीवर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी त्यावेळी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

accused who threw slippers at judge was sentenced to two years In Bhiwandi
भिवंडीत न्यायाधीशांच्या अंगावर चपला भिरकावणाऱ्या आरोपीला दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

ठाणे : भिवंडी न्यायालयात शिक्षेची सुनावणी करतानाच आरोपीने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्याप्रकरणी शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम गुप्ता यांनी दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या बद्दल माहिती सरकारी वकील विजय मुंडे यांनी दिली. अशरफ अन्सारी (वय,23 रा. आमपाडा, भिवंडी) असे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चोरीच्या गुन्ह्याच्या सुनावणी वेळी घडला होता प्रकार -

आरोपी अशरफ अन्सारीवर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी भारतीय दंड विधान कलम 454, 380, 457, 34 अंतर्गत भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांच्या संदर्भात भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस.जे. पठाण यांच्यासमोर 29 जानेवारी 2019 रोजी शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता.

सहा महिन्यांची शिक्षा सुनावताच आरोपी भिरकल्या चपला -

आरोपी न्यायधीशावर चपला फेकण्यापूर्वी मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस.जे.पठाण यांच्यासमोर हजर केले असता, तुला गुन्हा कबूल असेल तर दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असं न्यायाधीशांनी आरोपी अशरफला सांगितलं. मात्र, मी आधीच 14 महिने शिक्षा भोगली असून ती कापून मला सोडून द्यावे, अशी विनंती आरोपीने केली होती. मात्र, आणखी सहा महिने शिक्षा भोगावीच लागेल, असे न्यायाधीशांनी सांगताच आरोपीला राग अनावर झाला. या रागातूनच त्याने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी त्यावेळी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Last Updated : Dec 12, 2020, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.