ठाणे - महानगरपालिकेत सुमारे ३०० आशा स्वयंसेविका काम करत आहेत. आशा स्वयंसेविकांना ठाणे महानगरपालिका स्वतःचे कर्मचारी मानत नाही. त्यांना शासकीय दर्जा द्यावा या आणि इतर अनेक मागण्यांसाठी आशा सेविकांनी भजन गात टाळनाद आंदोलन केले.
दरम्यान, या कर्मचाऱ्यांना मानधनी स्वयंसेविका असे गोंडस नाव दिले आहे. त्यांना शासनाकडून अल्पसे मानधन दिले आहे. आशा कर्मचाऱयांच्या मानधनामध्ये ऑक्टोबर २०१९ पासून दरमहा दोन हजार रुपयांची मानधनवाढ देण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. ती रक्कमसुद्धा महानगरपालिकेने कर्मचाऱयांना दिलेली नाही. ती रक्कम फरकासह आशा स्वयंसेविकांना देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी ठाणे महानगरपालिकेवर टाळनाद भजन आंदोलन केले आहे. महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -
विज्ञान दिन विशेष: 'या' महिला वैज्ञानिकाने इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम केली फत्ते
मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा कायदा लवकरच, नवाब मलिकांची विधानपरिषदेत घोषणा