ETV Bharat / city

राबोडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, 67 कुटुंबांना केले स्थलांतरित

तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळ मजल्यावर कोसळल्याने तळ मजल्यावरील रहिवासी दबले गेले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीम आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी या तिघांना बाहेर काढले. या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Sep 12, 2021, 12:49 PM IST

Updated : Sep 12, 2021, 1:11 PM IST

ठाणे - ठाण्यातील राबोडी परिसरात तिसऱ्या मजल्याववरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 6च्या दरम्यान ही घटना घडली असून तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळ मजल्यावर कोसळल्याने तळ मजल्यावरील रहिवासी दबले गेले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीम आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी या तिघांना बाहेर काढले. या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. रमिज शेख (32) आणि गौस तांबोळी (38) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर अरमान तांबोळी ही व्यक्ती जिवंत असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रूम रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

ठाण्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असून ठाण्यात या दोन दिवसात पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. राबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही 25 वर्ष जुनी इमारत असून आज पहाटे 6च्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या अश्फाक वागनी यांचा पूर्ण स्लॅब हा तळ मजल्यावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, फायर ब्रिगेड हे घटनास्थळी दाखल झाले. तीन जण या स्लॅबखाली दबले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन करून या तिघांना बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. यापैकी एकाला संजीवनी हॉस्पिटल तर दोघांना लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

25 वर्ष जुनी इमारत

खत्री अपार्टमेंट ही 25 वर्ष जुनी इमारत असून धोकादायक झालेल्या सी विंगमधील 24 खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या सर्व कुटुंबातील लोकांचे जवळच्या खांदेशी मस्जिदमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील अनेक इमारती या जीर्ण झाल्या असल्याने अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितालादेखील धोका निर्माण झाला आहे.

अनेकवेळा नोटीस देऊनही कारवाई नाही

ही इमारत धोकादायक झाली असल्याचे ठाणे महानगरपालिकेने येथील नागरिकांना या आधी अनेकवेळा नोटीस देऊन सांगितले होते, तरीदेखील पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने येथील कुटुंबे ही इमारत सोडत नव्हते. अपघात घडला तेव्हा जवळपास 67 कुटुंब या इमारतीत राहत होते. आता ठाणे महानगरपालिकेने अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव धोक्यात न घालता पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Last Updated : Sep 12, 2021, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.