ETV Bharat / city

बनावट पासपोर्ट बनवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात पाठवणाऱ्या टोळीला अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई - ठाणे पोलीस कारवाई

बांगला देशातून आलेल्या घुसखोर महिला आणि पुरुषाचा बनावट पासपोर्ट बनवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात मालदीव येथे पाठवून पैसे कामवणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांच्याकडून बांगलादेशात बनवलेले पाच बनावट जन्मदाखले, ४ आधार कार्ड, ४ पॅनकार्ड, ४ बांगला देशातील सिमकार्ड, बांगला देशातील २ एटीएम, आणि १२ जणांचे भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

बनावट पासपोर्ट बनवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात पाठवणाऱ्या टोळीला अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

author img

By

Published : Aug 14, 2021, 9:12 PM IST

ठाणे - बांगला देशातून आलेल्या घुसखोर महिला आणि पुरुषाचा बनावट पासपोर्ट बनवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात मालदीव येथे पाठवून पैसे कामवणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांच्याकडून बांगलादेशात बनवलेले पाच बनावट जन्मदाखले, ४ आधार कार्ड, ४ पॅनकार्ड, ४ बांगला देशातील सिमकार्ड, बांगला देशातील २ एटीएम, आणि १२ जणांचे भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

बनावट पासपोर्ट बनवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात पाठवणाऱ्या टोळीला अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

खबऱ्याने दिली माहिती

(१० ऑगस्ट, २०२१)रोजी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे बंगलादेशी नागरिकांना परदेशी जाण्यासाठी भारतीय बनावटीचे पारपत्र तयार करून देणारा बांगलादेशी घुसखोर विटावा कळवा ठाणे येथे येणार असल्याची खबऱ्याने माहिती दिली. सदरच्या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव आणि पथकाने विटावा कळवा येथे सापळा रचून राजू उर्फ फारुख सफी मोल्ला वय. २९ रा. १८६ शंकर रेसिडन्सी आंबोली सुरात ग्रामीण गुजरात) हा मुलाचा गरम मुल्लापाडा, पोस्ट सिपीहाट, ठाणे रूपसा जिल्हा खुलना बांगलादेश याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र सापडली नाहीत. भारत-बांगला सीमेवरून छुप्या पद्धतीने भारतात दाखल होऊन कळवा विटावा परिसरात प्रवेश केला. त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने पारपत्र नियम १९५० चे कलम ३(अ), ६(अ) सह परकीय नागरिकांचा कायदा १९४६ चे कलम १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरातला गेले गुन्हे शाखेचे युनिट

गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने तपासासाठी गुजरात गाठून बांगलादेशी ११ नागरिकांची धरपकड केली. तर, कळवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तीन आरोपींना ताब्यात घेऊन अन्य ८ आरोपींना सुरत गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता आरोपींमध्ये राजू उर्फ फारुख सफी मोल्ला(२९) रा. १८६ शंकर रेसिडन्सी आंबोली सुरात ग्रामीण गुजरात हा मुलाचा गरम मुल्लापाडा, पोस्ट सिपीहाट, ठाणेरूपसा जिल्हा खुलना बांगलादेश आरोपी सौ श्रुती राजूमोल्ला (२६) रा. सैदर्शन अपर्त्मेंत ३०८, नोयापूर वाररस्ता आयसीआयसीआय बँक वरती किम कोसंबी, गुजरात सुरत, आरोपी मोहम्मद इमोन मोईन खान (३८) रा. स्वागत रेसिडन्सी रूम नं १०२, आंबोली कठोर कामरेज, सुरत गुजरात, आरोपी मोहम्मद सैफुल आलाउद्दीन मोल्ला(३६) रा. रूम नं ३२४ पहिला माळा संदीपान विद्यालय समोर पोस्ट-लिंबायत , अश्पाश मंदिर सुरत गुजरात राज्य यांचा समावेश आहे.

वेश्या व्यवसायासाठी पाठवून पैसे कमवत असल्याचे आले समोर

बांगलादेशातून आलेल्या महिलांना बनवत पासपोर्ट बनवून त्यांच्या माध्यमातून परदेशात वेश्या व्यवसायासाठी पाठवीत होते. त्यांनी पासपोर्टसाठी वापरलेले कागदपत्र हे बनावट बनवल्याचे तपासात समोर आले आहे. आयात जन्मदाखला, घराचे भाड्याचा करार, बँक खाते, कर भरणा फाईल आदि बनवून या महिला मालदीव येथे वेश्या व्यवसायासाठी पाठवून पैसे कमवत होत्या अशी माहिती तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची धडक कारवाई गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने केली. अटक आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी महिलांना बनावट पासपोर्टवर कुठल्या-कुठल्या देशात पाठवले याचा शोध पोलीस पथक घेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.