ठाणे - ठाणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात यश मिळविल्यानंतर या नव्या संकटाने ठाण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींची चिंता वाढवली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 3 तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढल्याने आता चिंता वाढली आहे. 25 वर्षाखालील 2 जण तर 56 वर्षाखालील 2 जण बाधित झाले असून यामध्ये 2 महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली आहे. रुग्णांवर उपचार करून पाठवण्यात आले असले तर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात असल्याचे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ठाणे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सोशल डिस्टेन्सिग आणि इतर आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा-चिंताजनक! जळगावात डेल्टा प्लस व्हेरियंटचे पुन्हा 6 नवे रुग्ण