ETV Bharat / city

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३५ टक्के वाढ; जुलैच्या पगारात मिळणार वेतनवाढ

महापालिका आयुक्तांनी सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी, विविध भत्ते अशा विविध विषयांवर महापालिकेच्या पदाधिकारी आणि कामगार संघटनांबरोबर चर्चा करून ही सुधारीत वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Mar 10, 2019, 1:38 PM IST

ठाणे महापालिका

ठाणे - महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारीत ३५ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. सेवेत असणाऱया वर्ग १ ते ४ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना कांबळे आयोगाने दिलेल्या वेतन श्रेणीच्या शेवटच्या टप्प्याला ३५ टक्क्यांनी गुणून येणारी रक्कम सहाव्या वेतन आयोगाकरिता सुधारीत ग्रेड पे म्हणून निश्चित करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने सातत्याने ही मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी, विविध भत्ते अशा विविध विषयांवर महापालिकेच्या पदाधिकारी आणि कामगार संघटनांबरोबर चर्चा करून ही सुधारीत वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिका

महापालिकेच्या जवळपास साडेसात हजाराहून अधिक कर्मचा-यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. ही सुधारीत वेतनश्रेणी १ जानेवारी २००६ पासून वेतन निश्चिती परिगणितनुसार निश्चित करण्यात येणार आहे. मात्र ही वेतनवाढ जूनच्या पगारापासून लागू करण्यात आली असून ती कर्मचा-यांना जुलै महिन्यात मिळणा-या वेतनात मिळणार आहे. सुधारीत वेतनश्रेणीचा फरक मात्र कर्मचा-यांना दिला जाणार नाही.

Intro:
ठाणे महापालिका कर्मचा-यांच्या वेतनात ३५ टक्के वाढ मात्र जुलैच्या पगारात वेतनवाढ मिळणारBody:
ठाणे महापालिकेतील कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारीत ३५ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत असणा-या वर्ग १ ते ४ पर्यंतच्या कर्मचा-यांना कांबळे आयोगानं दिलेल्या वेतनश्रेणीच्या शेवटच्या टप्प्याला ३५ टक्क्यांनी गुणून येणारी रक्कम सहाव्या वेतन आयोगाकरिता सुधारीत ग्रेड पे म्हणून निश्चित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतल्यामुळं कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीनं सातत्यानं ही मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी, विविध भत्ते अशा विविध विषयांवर महापालिकेच्या पदाधिकारी आणि कामगार संघटनांबरोबर चर्चा करून ही सुधारीत वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांच्या सुधारीत वेतनात ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. महापालिकेच्या जवळपास साडेसात हजाराहून अधिक कर्मचा-यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. ही सुधारीत वेतनश्रेणी १ जानेवारी २००६ पासून वेतन निश्चिती परिगणितनुसार निश्चित करण्यात येणार आहे. मात्र ही वेतनवाढ जूनच्या पगारापासून लागू करण्यात आली असून ती कर्मचा-यांना जुलै महिन्यात मिळणा-या वेतनात मिळणार आहे. सुधारीत वेतनश्रेणीचा फरक मात्र कर्मचा-यांना दिला जाणार नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.