ठाणे - अंबरनाथमध्ये एका रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत साफसफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम परिसरात असलेल्या आयटीआय जवळील रासायनिक कंपनीत घडली असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. खळबळजनक भाग म्हणजे मृत्यू पावलेल्या कामगारांना या ठेकेदाराने रासायनिक टाकीच्या आतून रंग काम करण्यासाठी बोलावले होते. मात्र त्यांना टाकीतील साफसफाई करण्यास सांगितले.