ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंद-खातीवली गावानजीक ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन भीषण आपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ३ जण जागीच ठार झाले तर एक 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या मुलीला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले आहे. लल्लन राय असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. तर मंजुळा सखाराम मुकणे, अजनूप शिरोळ, गणपत दगडू वाघे आणि बाबू मधू फसाळे असे अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे आहेत.
दुचाकीचा चालक थेट ट्रॅक्टरला येऊन धडकला..
लल्लन राय हा ट्रॅक्टर चालक बुधवारी सायंकाळी मुंबईहून वाशिंद गावाकडे जात होता. यावेळी समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येणारी दुचाकी थेट ट्रॅक्टरवर येऊन धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील ३ जण जागीच ठार झाले तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. तिघांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवव्हिच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
स्पीड ब्रेकर नसल्याने अपघाताची मालिका ..
आपत्ती टीम सदस्य निलेश शेलार, निलेश काठोळे यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना रिक्षामध्ये रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे स्पीड ब्रेकर होते. ते हायवेच्या ठेकेदार कंपनीने काढल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी व येणारी वाहने सुसाट असतात. परिणामी पेट्रोल पंपावरून येणारी वाहने असोत अथवा सर्व्हिस रोडवरून येणारी वाहने असोत ती मुख्य रस्त्यावर स्पीडने येत असतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची काही कल्पना नसल्याने अपघात होतात. या ठिकाणी रबरिंग स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे, अशी मागणी आता वाशिंद व खातीवलीकर करीत आहेत.