ETV Bharat / city

Ganja seized in Dombivali : डोंबिवलीत फिल्मी स्टाईलने कारमधून २७२ किलो गांजा जप्त; दोन तस्कर गजाआड - Manpada Police Station

डोंबिवलीमध्ये ( Dombivli Manpada Police ) गांजा तस्करांना पकडून ( Police Nab Marijuana Smuggler ) पोलिसांनी 272 किलो गांजा जप्त ( 272 kg of cannabis seized ) केला आहे. पोलिसांना मोकळ्या मैदानात उभी असलेली इनोव्हा कार संशयास्पतरीत्या उभी असलेली आढळून आली त्यामुळे तिची चौकशी केली असता त्यामध्ये विविध पिशव्यांमध्ये गांजा भरून ठेवल्याचे आढळून आले. तस्करांकडून जवळजवळ ४७ लाख ७६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. ( Cannabis Worth Rs 47 lakh 76 thousand seized )

Cannabis seized in Dombivali
डोंबिवलीत गांजा जप्त
author img

By

Published : Jul 2, 2022, 4:07 PM IST

ठाणे : फिल्मी स्टाईलने सापळा रचून गांजा तस्करांच्या कारमधून विक्रीसाठी आणलेला तब्बल २७२ किलो गांजासह ( 272 kg of cannabis seized ) दोन तस्करांना ( Two smugglers arrested ) मानपाडा पोलिसांनी ( Dombivli Manpada Police ) बेड्या ठोकल्या आहेत. फैसल फारूख ठाकूर (वय २१ वर्षे रा. माझगाव, मुंबई ) मोहम्मद आतीफ हाफीज उल्ला अन्सारी (वय-३२ वर्षे रा. गैबीनगर, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत.

डोंबिवलीत गांजा जप्त

मोकळ्या मैदानात कारमधून गांजा विक्री : डोंबिवलीच्या मानपाडा हद्दीत अवैध गांजा (अमली पदार्थांची) विक्री होत असल्याची माहिती मानपाडा पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल भिसे हे पोलीस पथकासह १ जुलै रोजी डोंबिवली पूर्वेकडील उंबार्ली गावाच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या मैदानात गांजा विक्रीसाठी दोन तस्कर कारने येणार असल्याने पथकाने फिल्मी स्टाईलने सापळा रचला होता.

पोलीसांना आला संशय : त्यावेळी एका मोकळ्या मैदानात एक इन्होव्हा कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस पथकाने कारमध्ये असलेल्या इसमाची तसेच इन्होव्हा कारची तपासणी केली असता, त्यात २७२ किलोग्राम वजनाचा गांजा वेगवेगळ्या प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये मिळून आला. हा गांजा येथूनच विविध भागांत विक्रीसाठी जात होता.

४७ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट १९८५ चे कलम ८ (क) २०(ब) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून फैसल फारूख ठाकूर, मोहम्मद आतीफ हाफीज उल्ला अन्सारी दोघांना अटक केली. या तस्करांकडून ४७ लाख ७६ हजार रुपये किमतीचा गांजा, इनोव्हा कार व ८ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ओडिसाहून डोंबिवलीत आला होता गांजा : अटक तस्करांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली भागात राहणाऱ्या गांजा विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या आरोपींना विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. विशेष म्हणजे हा २७२ किलो गांजा ओडिसाहून डोंबिवलीत आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या पूर्वीही धुळ्याच्या जंगलात पिकवलेला शेकडो किलो गांजा मानपाडा पोलिसांनी पकडला होता. हा गांजा डोंबिवली, कल्याण भागातील महाविद्यालयीन तरुणांना विक्री होत असल्याचे त्यावेळी पोलीस तपासात समोर आले. तर आता गांजा तस्कराचे कनेक्शन ओडिसी राज्यात असल्याने त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली आहे.

हेही वाचा : Cannabis Smuggler Arrested : ठाण्यात ऑटो रिक्षातून गांजाची तस्करी; १५ किलो गांजासह तस्कर अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.