ETV Bharat / city

विशेष : ठाणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात २४ टक्के घट - चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात २४ टक्के घट

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात एकूण ३५ पोलीस ठाणे असून यामध्ये ५ पोलीस परिमंडळ आहेत. पोलिसांनी शहरी भागातील चेन स्नॅचिंगचे गुन्हे कमी करण्यात यश मिळविले असून यावर्षी नोव्हेंबरपर्यंत गुन्ह्याचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाले आहे.

reduction in chain snatching crime
चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात २४ टक्के घट
author img

By

Published : Dec 30, 2020, 3:18 PM IST

Updated : Dec 30, 2020, 3:34 PM IST

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात एकूण ३५ पोलीस ठाणे असून यामध्ये ५ पोलीस परिमंडळ आहेत. पोलिसांनी शहरी भागातील चेन स्नॅचिंगचे गुन्हे कमी करण्यात यश मिळविले असून यावर्षी नोव्हेंबरपर्यंत गुन्ह्याचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाले आहे. विशेषतः लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसात चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र अनलॉक काळात विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे कमी -

गेल्या वर्षी म्हणजे २०१९ जानेवारी ते नोव्हेंबर या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या शहरी भागात चेन स्नॅचिंगचे १७५ गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे या गुन्ह्यापैकी ९९ गुन्ह्याचा शोध लावल्याने या घटनेतील ५७ टक्के गुन्हे उघडकीस केल्याचा दावा स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या वर्षपासून विविध पथके तयार करून पोलिसांची गस्त वाढविल्याने गुन्हे कमी झाली आहेत. मात्र यावर्षी आतापर्यंतच्या काळात ११० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापौकी ३६ टक्के गुन्ह्यांचा शोध लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे कमी झाले आहेत. विशेषतः लॉकडाउन कालावधीत पोलिसांच्या २४ तासांच्या बंदोबस्तामुळे इतरही गुन्ह्यात घट झाल्याचे दिसून आले आहे.

ठाणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात २४ टक्के घट
बहुतांश आरोपी अनलॉक काळात जेरबंद -

परिमंडळ तीन पोलिस उपायुक्त विवेक पानसरे म्हणाले की, चेन स्नॅचिंगच्या गुन्हें कमी झाले असून अशा चोरट्यांचा शोधण्याचे प्रमाणही वाढविण्याच्या प्रयत्नांचा परिणाम झाला आहे. आम्ही चेन स्नॅचिंग प्रकरणात गुंतलेल्या बहुतांश आरोपींना जेरबंद केले आहेत. तसेच त्यांच्याकडून दागदागिने जप्त करून अशा दागिन्यांची नोंद करून त्या-त्या नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ठाणे, ग्रामीण ठाणे भागातील आमच्या पोलीस चौक्यांना बळकटी दिली. काही बाबींचा अभ्यास केल्यानंतर आम्ही चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी नाकाबंदी व गस्त घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे काही गुन्ह्यातील आरोपींना सापळा रचून अटक केली आहे. तर महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बनकर म्हणाले, कि आम्ही बाईक चेन स्नॅचर्सना पकडण्यासाठी सर्व पोलीस चौक्यांवर तपासणी ठेवली असून यामध्ये पहाटे, दुपारी आणि संध्याकाळी उशिरा काही संशयित चोरटे पायी चालणाऱ्या नागरिकांचा लक्ष्य केल्याचे आढळून आले. त्यामुळे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी निर्जनस्थळ असलेल्या रस्त्यावरही पोलिसांची गस्त वाढवली आहे.

सर्वात मोठ्या चेन स्नॅचिंगच्या टोळीतील ४२ गुन्हेगार जेरबंद -

पोलीस परिमंडळ ३ च्या हद्दीत असलेल्या आंबिवली नजीकच्या गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या ईराणी वस्तीत जिल्ह्यातील सर्वात मोठी चेन स्नॅचिंगची टोळी आहे. या टोळीतील आतापर्यत चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात ४२ गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाल्याचे पोलीस उपाआयुक्त विवेक पानसरे यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखती सांगितले.

धूम स्टाईलने दुचाकी चालवून अनेक गुन्हे -

बहुतेक संशयित चोरटे निर्जन रस्त्यावर चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिलांना लक्ष्य बनवण्याच्या एकाच पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे अनेक गुन्ह्यात उघडकीस आले आहे. कोरोनाच्या काळात रस्त्यावर चालताना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यासाठी पोलिसांनी लॉकडाऊनपूर्वीच जनजागृती मोहीम राबवत आहेत. परंतु अनलॉक काळात पोलीस कर्मचारी आता कमी पडले असल्याचे सांगण्यात आले. त्यातच सर्व झोनमध्ये विवाह सोहळे सुरू झाल्याने पोलिसांनी अनेक मंगल कार्यालयांच्या मालकास त्यांच्याकडे विविह सोहळ्यात दागिने घालून येणाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यास व जागरूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चोरटे नागरिकांना भूलथापा मारून साधतात डाव -

चोरटे नागरिकांना बतावणी करीत खाली तुमचे पैशे पडले, हा पत्ता सांगणार का, शेठला मुलगा झाला म्हणून गरिबांना मदत करीत अश्या विविध प्रकारच्या थापा मारून नागरिकांच्या गळ्यातील सोन साखळी दुचाकीवरून धूम स्टाईलने लंपास करीत असल्याचे अनेक गुन्ह्यात समोर आले आहे. आजही पोलीस परिमंडळ ३ च्या हद्दीत चार गुन्हे उघडकीस आणून तीन आरोपीना अटक केली आहे.

जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांचा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सहभाग !

कोरोनाच्या काळात कारागृहात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने कारागृहातील शेकडो कैद्यांना जामीन मंजूर करून सोडण्यात आले होते. त्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आता हेच आरोपी अनलॉक काळात चोऱ्या माऱ्या करीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Last Updated : Dec 30, 2020, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.