ETV Bharat / city

भाईंदरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; ४ दिवसांनंतर गुन्हा दाखल - ठाणे गुन्हे बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार दिवस फेऱ्या मारुनदेखील पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

thane crime news
भाईंदरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार..४ दिवसांनंतर गुन्हा दाखल..!
author img

By

Published : Aug 1, 2020, 8:32 AM IST

Updated : Aug 1, 2020, 2:08 PM IST

ठाणे - लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार दिवस फेऱ्या मारुनदेखील पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. महिला पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी मला पोलीस ठाण्यातून हाकलून लावले, असा आरोप पीडितेने केला आहे.

भाईंदरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; ४ दिवसांनंतर गुन्हा दाखल

भाईंदर पश्चिम येथे राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाईंदर पोलीस ठाण्यात चार दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस धमकी देत असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.

मानसिक त्रास होत असल्यामुळे ३० जुलैला या पीडितेने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण..?

पीडित मुलगी आणि आरोपी योगेश चौरसिया यांचे ३ वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. २५ जुलै रोजी आरोपी योगेशनी पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिच्यावर अत्याचार केले. २६ जुलै रोजी आरोपीने पीडितेला तिच्या घरी सोडले; आणि तो स्वतःही निघून गेला. पीडित मुलीने योगेशला फोन करून, लग्नासंबंधी काही प्रश्न विचारल्यानंतर आरोपीने उडवाउडवीची उत्तरं तसेच शिवीगाळ केली. त्यानंतर पीडित मुलगी पोलीस ठाण्यात गेली. माझ्या विरोधात तक्रार द्यायला जातेस, म्हणून योगेशने तिला धमकी दिली.

मात्र चार दिवस फेऱ्या मारून पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी कोणत्याही प्रकारची दाखल घेतली नाही. याचा मानसिक त्रास झाल्याने पीडितेने राहत्या घरी काल ३० जुलैला फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांनी तिला तत्काळ मिरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. परंतु या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत असे सांगत रुग्णालय प्रशासनाकडून शताब्दी रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगण्यात आले.

मात्र शताब्दी रुग्णालयात कोविड रुग्ण असल्यामुळे तेथे देखील उपचार झाले नहीत. अखेर मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांनी औषधोपचार करून पुन्हा मिरारोडवरील इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यास सांगितले. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

...तू मुलाला घेऊन गावी जा

पीडितेने महिला पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मुलाला घेऊन गावी जाण्याचा सल्ला पीडितेला दिला. पोलिसांकडे जाऊन माझी मुलगी वैतागली होती. त्यात आरोपीने घरी येऊन मारहाण केल्याने तिने मानसिक त्रासातून फिनाईल प्यायले, असे पीडितेच्या आईने सांगितले.

तिला उपचारासाठी दाखल का करून नाही घेतलं..?

पीडितेच्या आईचा वारंवार फोन येत असल्याचे आमदार गीता जैन यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालयात मुलीची भेट घेतली. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले, सत्य परिस्थिती जाणून घेऊन पोलिसांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांच्याकडे कारवाईची मागणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

तर रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांचा जैन यांनी चांगलाच समाचार घेतला. काल रात्री आपण या मुलीला उपचारासाठी का दाखल केले नाही,असा जाब त्यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला. पीडितेला न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया आमदार गीता जैन यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

Last Updated : Aug 1, 2020, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.