ETV Bharat / city

भिवंडीतील चिंबीपाडा आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांसह २ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Jan 3, 2022, 7:04 PM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातच कोरोनाचा शिरकाव पुन्हा ग्रामीण भागात वाढला असून आज भिवंडी चिंबीपाडा शासकीय आश्रम शाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Chimbipada Ashram School corona
चिंबीपाडा आश्रम शाळा कोरोना

ठाणे - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातच कोरोनाचा शिरकाव पुन्हा ग्रामीण भागात वाढला असून आज भिवंडी चिंबीपाडा शासकीय आश्रम शाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. लागण झाल्यांमध्ये १८ विद्यार्थी आणि २ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

शाळेचे दृश्य

हेही वाचा - Ambernath Gang Rape : अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असताना भिवंडीमध्ये सुद्धा पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. अजूनही विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू आहे. आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती डॉ. धरणे यांनी दिली असून बाधित रुग्णांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

४७० विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी

या आश्रमशाळेत तब्बल ४७० विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी करण्यासाठी चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दाखल झाले. दरम्यान १८ विद्यार्थ्यांसह २ कर्मचारी, असे एकूण २० जणांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आश्रमशाळेत गर्दी केली आहे.

हेही वाचा - वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ठाण्यात 31 डिसेंबरला एकही अपघात नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.