ETV Bharat / city

विजेचा जोरदार झटका लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू - विजेचा झटका लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

विजेचा जोरदार झटका लागून १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास निजमपुरा पोलीस करत आहेत.

13-year-old boy dies of electric shock
विजेचा जोरदार झटका लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
author img

By

Published : Jun 8, 2021, 8:52 PM IST

ठाणे - बंद असलेल्या खोल्यांमध्ये खेळण्यास गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला विजेचा जोरदार झटका लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरा लगत असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. सोनू सुभाष शहा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

विजेचा जोरदार झटका लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

खेळता खेळता लागला विजेचा धक्का -

भिवंडी शहरालगतच्या मिठपाडा नजीक खोणी ग्रामपंचायत हद्दीत बाळाराम शास्त्री चाळ असून या चाळीतील भाडोत्री गावी निघून गेल्याने खोली बंद होती. त्यातच याच चाळीतील एका बंद खोलीत मृत सोनू हा दुपारच्या सूमारास खेळण्यासाठी गेला होता. यावेळी तेथील विद्यूतवाहक तारेमध्ये विद्यूतप्रवाह सुरू असल्याने त्याचा धक्का त्या तारेस लागला असता जोरदार झटका लागून तार मुलाच्या अंगाला चिकटली व त्याचा विद्यूतप्रवाहचा झटका लागल्याने सोनू जागेवरच कोसळला.

पोलीस तपास सुरू -

स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी बेशुद्ध अवस्थेत मुलाल स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेनंतर निजमपुरा पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा करत घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.