ठाणे : मोबाईल कॅमेऱ्यामध्ये स्वतःचा सेल्फी काढण्याच्या नादात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरून खाली पडला. आणि यात एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील हिना मार्केट या इमारतीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मोहम्मद उबेद शेख असे सेल्फीच्या नादात जीव गमावलेल्या मुलाचे नाव आहे.
Thane Crime News : सेल्फीच्या नादात 13 वर्षीय मुलाने गमावला जीव - Shantinagar police Thane
मोहम्मद हा सेल्फी काढण्यासाठी इमारतीच्या छताच्या एका कोपऱ्यावर उभा राहून मंगळवारी सायंकाळी मोबाईलमध्ये सेल्फी(13 year boy lost his life while taking selfie) काढत होता. त्यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. आणि त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
Thane Crime News
ठाणे : मोबाईल कॅमेऱ्यामध्ये स्वतःचा सेल्फी काढण्याच्या नादात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरून खाली पडला. आणि यात एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील हिना मार्केट या इमारतीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मोहम्मद उबेद शेख असे सेल्फीच्या नादात जीव गमावलेल्या मुलाचे नाव आहे.
Last Updated : Dec 7, 2021, 5:00 PM IST