ETV Bharat / city

Vijay Diwas : पाकिस्तानी सैनिकांनी मित्राचा जीव घेतला, मग आम्ही त्यांच्यावर तुटून पडलो : युद्धाच्या आठवणींनी माजी सैनिकाचे डोळे पाणावले - Maratha Battalion Indian Army

भारत आणि पाकिस्तानदरम्यान १९७१ साली युद्ध ( India Pakistan War 1971 ) झाले. त्यात भारताचा विजय झाला आणि बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती ( Bangladesh Became An Independent Country ) झाली. तेव्हापासून १६ डिसेंबर रोजी विजय दिवस ( 16 December Vijay Diwas ) साजरा केला जातो. या युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक महादेव अंबुरे ( Ex Serviceman Mahadev Ambure ) यांना प्रश्न विचारताच त्यांचे डोळे पाणावले. युद्ध जिंकल्यापेक्षा सहकारी शहीद झाला याचे जास्त दुःख झाले, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

महादेव अंबुरे
महादेव अंबुरे
author img

By

Published : Dec 16, 2021, 4:40 PM IST

Updated : Dec 16, 2021, 5:31 PM IST

सोलापूर- दरवर्षी 16 डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा ( 16 December Vijay Diwas ) केला जातो. भारत पाकिस्तान दरम्यान ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झालेले युद्ध ( India Pakistan War 1971 ) १६ डिसेंबर रोजी संपले. या युद्धात भारताने पाकिस्तान देशातून बांगलादेश या देशाची निर्मिती ( Bangladesh Became An Independent Country ) केली. पाकिस्तानी फौजेने शरणागती ( Pakistan Surrender ) पत्करली होती. १९७१ युद्धात सहभागी झालेले सोलापुरातील माजी सैनिक महादेव अंबुरे ( Ex Serviceman Mahadev Ambure ) यांनी 'ई टीव्ही भारत' समोर आपल्या भावना व्यक्त केल्या. 'युद्ध जिंकल्यापेक्षा आपला सहकारी पांडुरंग साळुंखे हे शहीद झाल्याचं अधिक दुःख झालं', असे सांगत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मित्राची आठवण काढली.

पाकिस्तानी सैनिकांनी मित्राचा जीव घेतला, मग आम्ही त्यांच्यावर तुटून पडलो : युद्धाच्या आठवणींनी सैनिकाचे डोळे पाणावले

दोन किलोमीटर पाठीवर घेऊन गेले

१९७१ च्या युद्धात पांडुरंग साळुंखे ( Ex Serviceman Pandurang Salunkhe ) आणि महादेव अंबुरे हे पहिल्या तुकडीत लढत होते. पाकिस्तानी सैन्याला जबरदस्त टक्कर देत होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग साळुंखे हे पाकिस्तानी सैनिकांवर तुटून पडले होते. मात्र, शत्रू राष्ट्राच्या गोळीबारात पांडुरंग साळुंखे यांना गोळ्या लागल्या. रात्रीच्या अंधारात महादेव अंबुरे आपल्या मित्राला दोन किलोमीटर खांद्यावर घेऊन गेले. मात्र, पांडुरंग यांनी आपले प्राण सोडले. युद्धाच्या पहिल्याच दिवशी जिवलग मित्र गमावल्याने आम्ही पाकिस्तानी सैनिकांवर तुटून पडल्याची माहिती महादेव अंबुरे यांनी दिली. १७ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर शरणागती पत्करली.

१९८४ साली भारतीय सैन्यदलातून निवृत्त
महादेव अंबुरे हे १९६९ रोजी भारतीय सैन्य दलातील मराठा बटालियनमध्ये ( Maratha Battalion Indian Army ) भरती झाले. ट्रेनिंग झाल्यानंतर युद्धाला तोंड फुटले. मेजर रणवीरसिंग तसेच इतर सहकाऱ्यांसोबत लढाईत सहभागी झाले होते. ३१ ऑगस्ट १९८४ रोजी ते सैन्यातून निवृत्त झाले. सोलापुरातील एन जी मिल येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून 18 वर्ष सेवा बजावली.

Last Updated : Dec 16, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.