ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या काळात पकडलेल्या गाड्या सोडायला सुरूवात, दररोज 300 वाहने सोडणार

author img

By

Published : Jun 2, 2020, 4:24 PM IST

सोलापूर शहरातील नॉर्थकोट प्रशाला आणि पोलीस मुख्यालय या दोन ठिकाणी ही जमा करण्यात आलेली वाहने ठेवली होती. मागील दोन महिन्यांपासून पोलिसांनी जमा केलेली ही वाहन आता सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानंतर आता दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहने सोडण्यात येत आहेत.

vehicles seized in a lockdown in solapur began to be released after paying a fine
लॉकडाऊनच्या काळात पकडलेल्या गाड्या सोडायला सुरूवात

सोलापूर - लॉकडाऊनच्या काळात शहरात विनाकारण फिरणाऱ्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. या गाड्या आता सोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आजपासून या पकडण्यात आलेल्या गाड्या सोडण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नका, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या होत्या. प्रशासनाने सूचना देऊन देखील अनेक नागरिक हे त्यांची वाहन घेऊन घराबाहेर पडत होती आणि शहरात विनाकारण फिरत होती. सोलापूर शहरात जवळपास आठ हजार वाहने पोलिसांनी जमा केली होती.

सोलापूर शहरातील नॉर्थकोट प्रशाला आणि पोलीस मुख्यालय या दोन ठिकाणी ही जमा करण्यात आलेली वाहने ठेवली होती. मागील दोन महिन्यांपासून पोलिसांनी जमा केलेली ही वाहने आता सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानंतर आता दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहन सोडण्यात येत आहेत.

दररोज सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत ही वाहने सोडण्यात येणार आहेत. दररोज 300 वाहने याप्रमाणे दोन्ही ठिकाणची मिळून 600 वाहने सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.