ETV Bharat / city

सोलापुरात गुरुवारी 556 पॉझिटिव्ह रुग्णांची भर; 25 रुग्णांचा मृत्यू - सोलापूर कोरोना आकडेवारी

सोलापुरात शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण ग्रामीण भागात चिंता कायम आहे.

corona
corona
author img

By

Published : Jun 3, 2021, 10:22 PM IST

सोलापूर - शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण ग्रामीण भागात चिंता कायम आहे. गुरुवारी सोलापुरात 556 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सोलापुरातील व्यापारी, कामगार सोलापूर अनलॉक करण्याची मागणी करू लागले आहेत. स्थानिक प्रशासकीय अधिकारी मात्र अनलॉकच्या आदेशाला राज्य सरकारकडे बोट दाखवत आहेत. सोलापूर शहराच्या लॉकडाऊन शिथिलतेबाबत गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत सोलापुरात जिल्हाधिकारी किंवा महापालिकेत कोणताही आदेश आलेला नाही. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही आज निर्णय देतो असे महापौरांना सांगितले होते. यामुळे उद्या सोलापूरमध्ये व्यापार चक्र सुरु होणार की जैसे थे स्थिती हा संभ्रम कायम आहे.

सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी 3 जून रोजी एकूण 996 जण कोरोना मुक्त झाले आहे. शहर आणि जिल्ह्यात असे एकूण नवीन 556 कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. सोलापुरातील एकूण 25 रुग्णांचा कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 4746 इतकी आहे.

सोलापूर शहर कोरोना अहवाल-

सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने शहरात 2036 जणांची तपासणी केली आहे. त्यामध्ये 16 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोलापूर शहरात गुरुवारी 77 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. शहरात 2 रुग्णांचा कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात कोरोना संसर्गजन्य महामारीवर हळूहळू नियंत्रण येत आहे. सोलापुरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. सद्यस्थितीत सोलापुरात 348 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सोलापूर ग्रामीण अहवाल-

सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने ग्रामीण भागात 15536 जणांची तपासणी केली. त्यामधून 540 नवे कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागातील 917 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. वाढत्या मृतांच्या आकडा मात्र पूर्वीसारखा कायम आहे. ग्रामीण भागात गुरुवारी 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात 4389 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांवर उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.