सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात आज शुक्रवारी 558 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर नवीन 508 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. सोलापुरात शुक्रवारी एकूण 23 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर शहर आणि जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या 4673 इतकी झाली आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीत विसंवाद नाही - अजित पवार
शुक्रवारपासून सोलापूर शहर हद्दीत लॉकडाऊनच्या नियमावलीत शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत अत्यावश्यक सेवा व इतर दुकानांना देखील महानगरपालिका प्रशासनाने व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे.
सोलापूर शहर कोरोना अहवाल-
सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने शहरात शुक्रवारी 1942 जणांची तपासणी केली.त्यामध्ये 22 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधा झालेल्या रुग्णांमध्ये 10 पुरुष व 12 स्त्रियां आहेत.तर एका स्त्री रुग्णाचा कोरोना विषाणूवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.सोलापूर महानगरपालिका हद्दीत शुक्रवारी 31 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे.त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहेत.शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील घटली आहे.सद्यस्थितीत 338 पॉजीटिव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच-
सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने ग्रामीण भागात 17 हजार 147 जणांची तपासणी केली. त्यामधील
486 जण कोरोना पॉजीटिव्ह आढळले आहेत.लागण झालेल्यामध्ये 292 पुरुष आणि 194 स्त्रिया आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागात 527 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात 22 रुग्णांनी कोरोनावर उपचार घेत असताना दम तोडला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4335 रुग्ण पॉजीटिव्ह असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.शुक्रवारी 4 जून रोजी माळशिरस येथे 105 रुग्ण आढळले आहेत.बार्शी येथे 116 रुग्ण,पंढरपूर येथे 73 रुग्ण ,माढा येथे 59 रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर या तालुक्यात सर्वात कमी रुग्ण म्हणजेच 9 रुग्ण,उत्तर सोलापूर तालुक्यात 11रुग्ण , सांगोला येथे 13 बाधित रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा - ... आणि विश्वासचा झाला 'विश्वासघात'; शिर्डीतील धक्कादायक प्रकार