सोलापूर- सध्या सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गावपातळीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आवाहन करण्यात आले आहे. त्याउपरही कोणी असा प्रयत्न केला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी पार्क चौकातील कार्यालयात वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध प्रश्नांनां पोलीस अधीक्षक सातपुते यांनी उत्तरे दिली.
रिकोर्डवरील संशयीतांवर कारवाई सुरू -
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला. तेव्हापासून गावभेटी घेण्यात येत आहेत. त्यामध्ये गावकर्यांना कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्यापुढे होणार्या पारिणामांची जाणीव त्यांना करुन देण्यात येत आहे. यापूर्वी असा प्रयत्न करणार्यांवर विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई बरोबरच तडीपार, हद्दपार करण्याची कारवाई सुरु आहे.
जिल्ह्यातील 557 गावामध्ये 450 गुन्हे दाखल -
जिल्ह्यातील 557 गावांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या शांततेत पार पडतील, यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे असे सातपुते यांनी यावेळी सांगितले. आचार संहिता सुरु झाल्यापासून अवैध दारु व्यवसायावर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 450 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्यारे जमा करून केली जात आहेत-
तसेच हत्याराचा वापर करुन मतदान करण्यास परावृत्त करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता असते. यामुळे हत्यारे जमा करुन घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ही पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील नाते घट्ट करण्याचे प्रयत्न करणार आहे. माहीला, मुली यांच्यासह सर्वसामान्य नागारीकांना पोलीस हे मित्रं वाटले पाहिजेत असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे ही सातपुते यांनी सांगितले.