सोलापूर - सोलापूर शहरातील गुजराती मित्र मंडळ येथे गुजराती भवन सोमवारी (19 सप्टेंबर) रोजी सकाळी वार्षिक बैठक होती. एक पुरस्कार सोहळा देखील या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित (SushilKumar Shinde big statement) होते. व्यासपीठावर बोलताना त्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी भाषणात बोलताना शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी मुख्यमंत्री असताना मला कटकारस्थान करून काढण्यात (removed from post of CM by conspiracy ) आले. राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेश येथे पाठविण्यात आले. ज्यांनी कटकारस्थान केलं, आज ते पराभवातच आहेत असेही शिंदे यांनी टोला लगावला.
जावई गुजराती असल्याने या समाजाला मी आरक्षण दिलं - मुख्यमंत्री पदावर असताना गुजराती समाजाला आरक्षण दिले होते. कारण माझा जावईही गुजराती आहे आणि त्या समाजासाठी मला ते करावे लागले. जावयाला सांभाळायचे म्हंटल्यावर हे सगळे करावे लागते. हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो, साधी गोष्ट नव्हती. पण आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरून चाललेत, असे विधान गुजराती मित्र मंडळाच्या कार्यक्रमादरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी (SushilKumar Shinde big statement) केले.
पक्षातील कटकारस्थानामुळे माझे मुख्यमंत्रीपद गेले - पक्षातील कटकारस्थानामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्याची खंत यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखवली. पक्षातील कारस्थान सर्वांना माहिती आहे. मला कसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात आले, राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवले. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रीमंडळात गेलो. मात्र त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत (conspiracy against Sushilkumar Shinde) आहे.