ETV Bharat / city

मोदी सरकारच्या आर्थिक अडवणुकीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत - राज्यमंत्री विश्वजित कदम

मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी साधी चर्चासुद्धा मोदी सरकार करायला तयार नाही, असे विश्वजित कदम म्हणाले आहेत.

author img

By

Published : Sep 18, 2021, 8:25 PM IST

Updated : Sep 18, 2021, 10:09 PM IST

Vishwajeet Kadam
राज्यमंत्री विश्वजित कदम

सोलापूर - मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी साधी चर्चासुद्धा मोदी सरकार करायला तयार नाही. राज्यातील भाजप सरकारच्या कार्यकाळात ऊर्जा खात्यात चाळीस हजार कोटी रुपयांची तूट वाढली होती, ती भरून काढतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीज खंडित न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोदी सरकारच्या आर्थिक अडवणुकीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत आले असल्याची प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

महाविकास आघाडी सरकार शेतकऱयांबरोबर आहे. भाजपची मंडळी फसवे आहेत, म्हणून तीन पक्षांनी मिळुन सर्वसामान्य जनतेसाठी युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. भाजपने खोटी व भरपूर निकष लावून फसवी कर्जमाफी केली होती. साधेसोपे निकष लावून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी केली आहे, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.

हेही वाचा - पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...

सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक कॉंग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती. यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, नगरसेवक बाबा मिस्त्री, ₹ संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, चेतन नरोटे, अध्यक्ष बाळासाहेब शेळके, करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मोहोळचे नगराध्यक्षा शाहीन शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, नरसिंग कोळी, नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन इनामदार, वैष्णवी करगुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

  • केंद्र सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करत आहे-

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्रातील मोदी सरकार तीस हजार कोटींची जीएसटीची रक्कम देत नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कोणतेही पूर्वसूचना न देता मोदी सरकारकडून लॉकडाऊन केला गेला. कोट्यवधी लोक रस्त्यावर भुकेने व्याकुळ चालत गावी गेले. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक लसी व रेमडेसिविर, औषधांचा पुरवठा कमी करण्यात आला. पण महाविकास आघाडी सरकारने धाडसी पाऊल उचलून कोरोनापासून संरक्षण करणे, उपचार करणे, कार्यक्षम आरोग्य सुविधा उभारले, आरोग्यासाठी भरपूर निधी दिला, यामुळे आज कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे, असेही विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - ....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी

Last Updated : Sep 18, 2021, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.