ETV Bharat / city

सोलापूर विद्यापीठाचा वर्धापनदिन पहिल्यांदाच ऑनलाइन - सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.

सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिन
सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिन
author img

By

Published : Aug 1, 2020, 8:43 PM IST

सोलापूर - केवळ एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन (1 ऑगस्ट ) शनिवारी ऑनलाइन संपन्न झाला.

प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाईन उपस्थित असलेले पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ऑनलाईन बोलताना आपले मत व्यक्त केले. विद्यापीठाने अल्प कालावधीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत गुणवत्तापूर्ण भरारी घेतली आहे. देशातील व विदेशातील नामांकित संस्था व विद्यापीठांशी सामंजस्य करार करून गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत नामांकित यादीत सोलापूर विद्यापीठाने आपले स्थान निर्माण केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

2004 साली स्थापन झालेल्या सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन पहिल्यांदाच ऑनलाईन झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विद्यापीठ, वर्धाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी केले. कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी यावेळी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. प्रारंभी सकाळी दहा वाजता विद्यापीठ प्रांगणात कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पालकमंत्री भरणे म्हणाले की, आज या विद्यापीठाने सोळा वर्षात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. दर्जेदार सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर या विद्यापीठाने विशेष स्थान उच्च शिक्षण क्षेत्रात निर्माण केले आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी चिकित्सकवृत्ती जोपासून चांगले शिक्षण घेत देशसेवेसाठी सज्ज व्हावे. आज या विद्यापीठात भाषा, आरोग्य, कृषी पर्यटन अभ्यासक्रमाबरोबरच उजनी धरणाच्या संशोधनाचे चांगले कार्य झाल्याचे कौतुकही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले. त्याचा सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. व तसेच पुढील काळात विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन शिक्षण धोरणात ‘क्रिएटिव्हिटी’ करण्यासाठी मोठा वाव आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल झालेले आहेत. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन शिक्षण देण्याची व शिक्षण घेण्याची संधी यामुळे आता निर्माण झाली आहे. विद्याशाखा बदल अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख कोर्सेस तसेच संशोधनाची भरपूर संधी मिळणार आहे.आत्मनिर्भर भारत करण्यासाठी नव्या शिक्षणाचा निश्चितच फायदा होणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 'विद्या संपन्नता' हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करत असलेल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी चांगले शिक्षण, संशोधन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी ऑनलाईन कार्यक्रमात विद्यापीठाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले तर मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांनी आभार मानले. ऑनलाइन कार्यक्रमासाठी डॉ. एस. डी. राऊत आणि प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी तांत्रिक सहाय्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.