सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सोपल हे 28 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी बार्शी येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.
मुन्नाभाई राजकारणात.. संजय दत्त जाणार महादेव जानकरांच्या पक्षात ?
बार्शीचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राहिलेल्या दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता बार्शी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोपल हेच सर्वेसर्वा होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बार्शीतील राष्ट्रवादीची उमेदवारी जवळपास त्यांनाच मिळणार होती, असे असतानाही सोपल राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
रत्नागिरीतून निवडणूक लढवण्यास प्रसाद लाड इच्छूक, युती होणार की नाही?
सेना-भाजपच्या जागा वाटपात बार्शीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आहे. सेना-भाजप यांची युती झाली तर बार्शीची जागा ही शिवसनेला राहणार आहे, त्यामुळेच सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दिलीप सोपल हे पूर्वीही शिवसेनेत होते...
सोपल हे 95 च्या काळात युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. 1995 मध्ये युतीचे सरकार सत्तेत येत असताना त्यांना अपक्षाची मदत लागणार होती. यावेळी दिलीप सोपल हे बार्शीतून अपक्ष म्हणून निवडून आले होते. सोपल यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेऊन युतीला पाठिंबा दिला आणि राज्यमंत्री पद मिळविले होते. आता पुन्हा ते एकदा शिवसेनेत दाखल होत आहेत.
बहुजन विकास आघाडीला खिंडार; आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश