ETV Bharat / city

सोलापूर महापालिका करणार कंटेनमेंट झोनमधील घरांमध्ये मास्क अन् साबणाचे वाटप - आयुक्त दिपक तावरे

सोलापूर शहरातील कंटेनमेंट झोनमधील घरांत मास्क आणि साबणाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महानगपालिका आयुक्त दिपक तावरे यांनी दिली आहे.

पालिका आयुक्त दिपक तावरे
पालिका आयुक्त दिपक तावरे
author img

By

Published : May 6, 2020, 1:05 PM IST

सोलापूर - शहरातील कंटेनमेंट झोन असलेल्या भागात 1 लाख मास्क आणि 12 हजार साबणांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त दिपक तावरे यांनी दिली आहे.

माहिती देताना पालिका आयुक्त दिपक तावरे

सोलापूर शहरात कोरोनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घरातील एकाला लागण झाली की सर्व कुटूंबाला कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घरात वावरताना देखील सोलापूरकरांनी तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी केले आहे.

सोलापूर शहरातील 31 ठिकाणी ही कोरोनाचे हॉटपॉस्प म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना मास्क वापरता यावेत यासाठी महापालिकेच्या वतीने एक लाख मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. मास्क सोबतच 12 हजार साबण देखील या भागात वाटप करण्यात येणार आहेत.
सोलापूरातील ज्या भागात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या भागात कष्टकरी कामगारांची संख्या जास्त आहे. या कष्टकरी कामगारांची वस्ती असलेल्या या भागात महापालिकेच्या वतीने मास्कचे आणि साबणाचे वाटप करण्यात येणार आहे. या भागातील प्रत्येक घरात सहा मास्क आणि एक साबण देण्यात येणार असून सर्व सोलापूरकरांनी घरात वावरत असताना मास्कचा वापर करावा, असे आवाहनही आयुक्त दिपक तावरे यांनी केले आहे.

हेही वाचा - कोरोनामुक्त रूग्णांवर फूलांची उधळण भोवली, एमआयएम नेते फारूक शाब्दी यांच्याविरोधात गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.