सोलापूर - लॉकडाऊनमध्ये गैलेक्सी ऑर्केस्ट्रा बार गेल्या चार महिन्यांपासून बंदच आहे. अंगावर कर्ज भलं मोठं आहे. उत्पन्नाच साधन देखील बंद आहे. कसं जगायचं, असा प्रश्न पडला व अमोल जगताप याने आपल्या कुटुंबातील सर्वांना संपविले व स्वतः गळफास घेत आत्महत्या केली, अशी नोंद पोलीस डायरीमध्ये झाली आहे. परंतू अमोल यांनी सुसाईड नोट, म्हणजे आत्महत्ये पूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये कोण-कोणते खासगी सावकार त्यांना मानसिक त्रास देत होते. याबद्दल सविस्तर माहिती आहे. आता या चिठ्ठीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन किती जणांवर कारवाई करणार याकडे सोलापूरकारांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी सायंकाळी अमोल जगताप या ऑर्केस्ट्रा बार चालकाने पत्नी मयुरी, दोन मुलं आदित्य व आयुष यांचा खून करून स्वतः देखील आत्महत्या केली आहे. मृताचा भाऊ राहुल जगताप याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली आहे. लॉकडाऊनमुळे गैलेक्सि ऑर्केस्ट्रा बार बंदच आहे.अंगावर लोकांची देणी वाढली होती. जगायचं कसं ,असा मोठा प्रश्न अमोल जगताप यांसमोर पडलं होतं. लॉकडाऊनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून बार बंद असल्याने टेन्शन वाढलं होते, अशी माहिती व फिर्याद मृत अमोल यांचे भाऊ राहुल जगताप यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिली आहे.
'त्या' चिट्ठीमध्ये गौडबंगाल
अमोल जगताप यांनी, मूर्त्यूपूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. त्या चिठ्ठीमध्ये ज्यांची ज्यांची उधारी देणी होती त्यांची नावे आहेत.आता यामध्ये खासगी सावकारांची नावे आहेत का? त्यांनी अमोल जगताप यांना मानसिक त्रास दिला होता का, या सर्व बाबींची तपासणी होणे गरजेचे आहे. त्या चिठ्ठीमधील मजकुराचा खुलासा करत पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर मोठे मासे गळाला लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.