ETV Bharat / city

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, १ तारखेला मतदान

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ तारखेला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील 197 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

dc solapur
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
author img

By

Published : Nov 29, 2020, 7:19 PM IST

सोलापूर - पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघात 35 शिक्षक उमेदवार तर 65 पदवीधर उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 197 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानावेळी कोरोना नियमांवलीचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. तसेच वेब कास्टिंगद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरील हालचालीवर वॉच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

मतदान केंद्रावरील कर्मचारी व मतदार संख्या-
सोलापूर जिल्ह्यात पदवीधर चे 53 हजार 813 तर 13 हजार 584 शिक्षक मतदार आहेत. पुणे मतदार संघात एकूण तर 4 लाख 26 हजार 430 तर पदवीधर तर 72 हजार 545 शिक्षक मतदार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 970 कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 62 क्षेत्रीय अधिकारी, 168 अधिकाऱ्यांची 42 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सूक्ष्म निरीक्षक 217, आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचारी 394 नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात एकूण 197 मतदान केंद्रावरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्ड ग्लोज, फेशशिल्ड दिले जाणार आहे. तसेच दोन मतदारांमध्ये सहा फुटांचे अंतर असणार आहे. सर्वांची तपासणी करूनच मतदारांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिली.

मतदारांचे नाव कोणते यादीमध्ये हे शोधण्यासाठी सर्च इंजिन लिंक प्रत्येक तालुक्यातून व जिल्हा कार्यालयात या साईटवर उपलब्ध करून दिली आहे.

अशी आहे तयारी-

* जास्त गर्दी झाल्यास अतिरिक्त मतदारांसाठी असणार वेटिंग रूम

* सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत चालणार मतदान प्रक्रिया

* प्रत्येक मतदान केंद्रावर तापमान तपासण्यासाठी स्वतंत्र दोन कर्मचारी नियुक्त.

* प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावली,

* दिव्यांगाना आवश्यक असलेली सुविधा शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

*ज्या मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था

*तसेच या मतदानासाठी बस 24, मिनी बस 30, जिप 14 अशा एकूण 68 वाहनांची सोय करण्यात आली आहे.

पोलीस बंदोबस्त-
पुणे व शिक्षक मतदार संघासाठी हे सोलापूर जिल्ह्यातील शहरासाठी 191, ग्रामीणसाठी 1148 असे एकूण 1339 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय-

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून 197 मतदान केंद्रावर, एकूण थर्मल गन 250 , फेसशिल्ड 3072, हॅन्डग्लोज 12500, मास्क 35000, प्रत्येक मतदान केंद्रावर पाच लिटरचे सॅनिटायझरचे कॅन, साबण 250, हँडवॉश 250 उपलब्ध करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.