ETV Bharat / city

आरोग्य खात्याच्या परीक्षा रद्द झाल्याने सोलापुरात भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन; टोपेंच्या प्रतिमेला मारले जोडे - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात आंदोलन

सोलापूर शहरात विविध शाळांत आरोग्य विभागाच्या क व ड वर्गाच्या परीक्षा शनिवारी (25 सप्टेंबर) आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र या पूर्व नियोजित परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी रात्री देण्यात आली. अचानकपणे परीक्षा रद्द केल्याचा संदेश मिळाल्यामुळे परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या किंवा परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या आणि या परीक्षेसाठी तयारी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

टोपेच्या प्रतिमेला मारले जोडले
टोपेच्या प्रतिमेला मारले जोडले
author img

By

Published : Sep 26, 2021, 10:35 AM IST

Updated : Sep 26, 2021, 12:48 PM IST

सोलापूर- आरोग्य खात्याच्या परीक्षा अचानक रद्द झाल्याने सोलापुरात विद्यार्थ्यांचा संताप व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील बस स्थानकामध्ये परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी आदोलकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिमेस जोडे मारून परीक्षा रद्द झाल्याचा संताप व्यक्त केला.

टोपेच्या प्रतिमेला मारले जोडले
टोपेच्या प्रतिमेला मारले जोडले

पर जिल्ह्यातील विद्यार्थी सोलापुरात दाखल; निराश होऊन घरी परतले-

आरोग्य विभागाच्या क व ड विभागाच्या परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर 25 सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्या होत्या. सोलापुरात देखील अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार होत्या. त्यासाठी लातूर, उस्मानाबाद, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील विद्यार्थी सोलापुरात शुक्रवारी दाखल झाले होते. पण ऐनवेळी रात्री सर्व परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेज आला आणि परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळाली. एककीडे आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दुपारीच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती की, अफवांवर विश्वास ठेवू नका, आणि दुसरीकडे रात्री त्यांच्याच आदेशानुसार परीक्षा रद्द करण्यात आली. ही विद्यार्थ्यांची फसवणूक आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी राजेश टोपे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना निराश होऊन घरी परतावे लागले.

भाजपा युवा मोर्चाचे आदोलन; टोपेंच्या प्रतिमेला मारले जोडे

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिमेस जोडे मारून केला निषेध-

या सर्व घडामोडी घडल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील बस स्थानकात येऊन परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन स्थानकामध्येच निषेध आंदोलन सुरू केले. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिमेस जोडे मारून परीक्षेचा निर्णय रद्द केल्याने टोपे यांचा निषेध केला. लवकरात लवकर आरोग्य खात्याच्या परीक्षा घेण्यात याव्यात आणि सद्यस्थितीत झालेला खर्च विद्यार्थ्यांना परत देण्यात यावा. किंवा पुढील तारखेला विद्यार्थ्यांना बस प्रवास मोफत देण्यात यावा, अशी मागणी यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या मागण्यांचा विचार न केल्यास महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही. त्यांचे ताफे अडविले जातील, असा इशारा यावेळी भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट, 'एमपीएससी'मार्फत परीक्षा घेण्याची मागणी

हेही वाचा - आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; राजेश टोपेंनी दिलगिरी व्यक्त करत न्यासा संस्थेवर फोडले खापर

हेही वाचा - Video : आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या प्रवेशपत्रात चुका; विद्यार्थी चिंतेत

Last Updated : Sep 26, 2021, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.