ETV Bharat / city

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी खुले

सोलापूर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दोन राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी आज उपस्थिती लावल्याचे दिसून आले. गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेले सिद्धेश्वर मंदिर पून्हा एकदा भाविकांनी गजबजले आहे.

सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी खुले

author img

By

Published : Nov 16, 2020, 4:50 PM IST

Updated : Nov 16, 2020, 5:32 PM IST

सोलापूर- नऊशे वर्षापूर्वी स्थापन झालेले सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर पहिल्यांदाच कोरोनामुळे दिर्घकाळासाठी बंद ठेवण्यात आले. तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार सामाजिक अंतर पाळून आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिद्धेश्वर मंदिर उघडण्यात आले. यावेळी असंख्य भाविकांनी सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले.

सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी खुले
सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी खुले

मंदिरावर अवलंबून व्यावसायिकांकडून निर्णयाचे स्वागत-

सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असतात. त्यामुळे फुले, पूजा साहित्य विक्रेत्यांचे व्यवसाय या भाविकांवरच विसंबून असतात. कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या आठ महिन्यापासून मंदिरे बंद होती. त्याचा फटका या विक्रेत्यांना बसला आणि त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले होते.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी-

लॉकडाऊन मध्ये मंदिरे मस्जिदे,चर्च, विहार अशी सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पक्षांकडून मंदिरे खुली करण्याची मागणी करत आंदोलने केली. त्यानंतर अखेर शनिवारी राज्य सरकारने दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरे आणि धार्मिक प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सोलापूर येथील प्रसिद्ध असे सिद्धेश्वर मंदिर सोमवारी सकाळी भाविकांसाठी खुले केले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

मंदिरच्या प्रवेशद्वारवर तापमान तपासणी व सॅनिटायझर फवारणी-

दर्शनासाठी मंदिर खुले करण्यापूर्वी शासनाने काही नियमावली घालून दिले आहे. त्यानुसार मंदिरात उपायोजनाही कऱण्यात आल्या आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारवरच तापमान तपासणीसाठी व सॅनिटायझर फवारणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात जाण्यापूर्वी प्रत्येक भाविकाला तापमान तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक अंतर राखून दर्शन घेण्यासाठी वेळोवेळी भाविकांना सूचना दिल्या जात आहेत. मास्क नसलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.

Last Updated : Nov 16, 2020, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.