सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील ग्रामपंचायतवर Chinchpur Gram Panchayat उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून भाजपाचा धुव्वा उडविला आहे. 7 पैकी 7 जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमर पाटील South Solapur Taluka President Amar Patil गटाचा विजय झाला आहे. चिंचपूर ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख Former Cooperation Minister Subhash Deshmukh यांनी मोठी ताकद लावली होती. मात्र उद्धव ठाकरेच्या शिवसेना गटाने भाजपचा धुव्वा उडविला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्या नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पहिली ग्रामपंचायत जिंकली महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्या नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे.एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे दोन गट महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहेत. या फुटीनंतर राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल हाती लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर या ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाने आपला विजयाचा झेंडा फडकविला आहे.
चिंचपूर ग्रामपंचायतवर मागील दोन टर्म पासून शिवसेनेची एकहाती सत्ता विजयी उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचपूर ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचीच एक हाती सत्ता आहे. जवळपास 1500 लोकसंख्या असलेल्या चिंचपूर गावाचा विकास हा एकच उद्दिष्ट ठेवून निवडणुकीत विजय संपादन करत आहेत अशी माहिती विजयी उमेदवारांनी दिली. मागील दोन टर्मचा अभ्यास करून मतदारांनी आपल्याला मत दिले आहेत. शिवसेनेचे दक्षिण तालुका अध्यक्ष अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक जिंकली आणि भाजप व रासपचा धुव्वा उडविण्यात आला आहे.
हेआहेत विजयी उमेदवार जय हनुमान विकास पॅनल या गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीत विजय नोंदविला आहे. यामध्ये संगव्वा बगले सचिन चडचन संगव्वा हत्तरसंग सविता साबळे गुरव्वा बनसोडे गौराबाई हत्तरसंग शंकर साबळे हे सात उमेदवार विजयी झाले आहेत.
हेही वाचा सदैव अटल अटलबिहारी वाजपेयींची पुण्यतिथी जाणुन घेऊया त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी