ETV Bharat / city

'सावरकर हे आंबेडकर-फुले यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे कधीही म्हणालो नाही'

सावरकरांचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्या तोडीचे आहे, असे शरद पोंक्षे म्हणाले. बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लोक मला दुसरी बाजू न विचारताच त्यावर रिअॅक्शनही देतात. हे अधिक क्लेशदायक आहे, असेही ते म्हणाले

sharad-ponshe-said-savarkars-task-to-remove-untouchability-is-on-par-with-phule-and-ambedkar
अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं कार्य फुले-आंबेडकरांच्या तोडीचेच - शरद पोंक्षे
author img

By

Published : Mar 7, 2020, 11:13 PM IST

सोलापूर - आपण कधीही सावरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे म्हटलेले नाही. मात्र, आपल्या भाषणाला आलेल्या लोकांना किंवा आपल्याला न विचारता, नीट माहिती न घेता ब्रेकिंग न्यूज देण्याच्या घाईत, काहीजणांनी तशी बातमी लावली. त्यावर काही जणांनी जे साहित्यिक म्हणून घेतात, त्यांनी आपल्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. हे सारं ऐकल्यानंतर मन खिन्न होते. हे एकून मी काय करणार? माझ्या हातात स्वतःचे वर्तमानपत्र नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते हे शरद पोंक्षे यांनी मांडले. अस्पृश्यता निवरणामध्ये महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोडीचंच कार्य सावरकरांचे आहे. मात्र, ज्यांना ब्रेकिंग न्यूज द्यायच्या आहेत, ते जाणीवपूर्वक बहुजन आणि ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेष वाढेल अशा पद्धतीने बातम्या देतात. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लोक मला दुसरी बाजू न विचारताच त्यावर रिअॅक्शनही देतात. हे अधिक क्लेशदायक आहे, असेही पोंक्षे म्हणाले.

अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं कार्य फुले-आंबेडकरांच्या तोडीचेच - शरद पोंक्षे

हेही वाचा - पाच दिवसांचा आठवडा : सोलापूर महानगरपालिकेत 350 कर्मचारी 'लेटकमर'

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पोंक्षे सोलापूरात आले होते. त्यावेळी ईटीव्ही प्रतिनिधीने त्यांना सावरकर आणि शाहू महाराज-आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी हा खुलासा केला. मी नथुराम गोडसे हे नाटक केले असले तरी मला महात्मा गांधींबद्दल आदर आहे. हा आदर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या बद्दलही आहे. ही महान माणसे आहेत. त्यांच्यावर टीका करणारा मी कोण? या सर्वांनी अस्पृश्यता आणि आणि जातीव्यवस्थेविरोधात केलेले बंड किंवा उठाव लक्षात घेतला पाहिजे. अजूनही आपण जातीव्यवस्थेत आहोत. आपण सारे मनुष्यजातीचे आहोत. सर्व हिंदू जातीचे आहोत, ही वज्रमूठ तयार झाली पाहिजे.

हेही वाचा- सोलापुरात शहराध्यक्षपदावरून 'एमआयएम'मध्ये बंडाळी

लहानपणी ज्यावेळी आंबेडकर आपल्या कुटुंबीयांसह फिरायला जात असतील आणि त्या काळच्या उच्चवर्णीयांनी त्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना होईल, अपमान होईल असे उद्गार काढले असतील, तेव्हा त्यांनी आपल्या पालकांना हे विचारून आपल्याला हे का शिव्या देतात? अपमान का करतात हे जाणून घेतल असेल. या विरोधात आपण बंड करू असे सांगितले असेल. तसेच वि. दा. सावरकरही आपल्या पालकांसमवेत फिरायला गेल्यानंतर उच्चवर्णीय अस्पृश्यांना शिव्या देतात, अपमानित करतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही एक माणूस दुसऱ्या माणसाचा अपमान करणारा कोण? असा सवाल आपल्या नातेवाईकांना केला. म्हणूनच स्वकीयांच्या विरोधात बंडाची भूमिका घेणारे सावरकरही मोठे होते. हे अस्पृश्यता निवारणाचे कार्य करणाऱ्या आंबेडकर फुले यांच्याप्रमाणे सावरकर श्रेष्ठच आहेत, असे आपले आजही ठाम मत आहे, असे शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केले. आपण जात मानत नाही. स्वतः आंतरजातीय विवाह केला आहे. मात्र, हल्ली केवळ ब्राह्मणांना टार्गेट केले जात आहे, हे सहन होत नाही. कशासाठी जात-पात हवी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.