ETV Bharat / city

Gathi Price Hike Solapur : गुडीपाडव्यात नागरिकांना बसणारा महागाईचा फटका; साखरगाठीच्या किमतीत वाढ

सोलापूर आणि महाराष्ट्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे दळणवळणाचा खर्च वाढला आहे. गुढीपाडव्याचा सण साजरा करताना नागरिकांच्या खिशाला महागाईचा फटका बसणार आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा साखरेच्या भावात वाढ झाली आहे. तसेच मजुरांची मजुरी देखील वाढली आहे. त्यामुळे यंदा साखरगाठींची दरवाढ करावी लागली, असल्याची माहिती व्यावसायिक सतीश पिसाळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

author img

By

Published : Mar 27, 2022, 5:14 PM IST

Updated : Mar 27, 2022, 5:31 PM IST

सोलापुरातील साखरगाठी
सोलापुरातील साखरगाठी

सोलापूर : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सोलापुरातील साखरगाठी तयार करणाऱ्या कारखानदारांची लगबग पहायला मिळत आहे. दीड ते दोन महिने सोलापुरातील साखरगाठी तयार करणारे कारखाने जोमात चालतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी, लॉकडाऊनचा जबरदस्त फटका छोट्या लघुउद्योगांना बसला आहे. मात्र कच्या मालाचे वाढलेले दर, वाढलेल्या मजुरीमुळे साखरगाठींच्या किंमत देखील वाढल्या आहे. गुढीपाडव्याला नैवेद्द म्हणून उपयोगात येणाऱ्या साखरगाठीची किंमत देखील वाढली आहे.

प्रतिक्रिया देताना साखरगाठी व्यावसायिक आणि कामगार

दळणवळणाचा खर्च वाढल्याने दरवाढ : सोलापूर आणि महाराष्ट्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे दळणवळणाचा खर्च वाढला आहे. गुढीपाडव्याचा सण साजरा करताना नागरिकांच्या खिशाला महागाईचा फटका बसणार आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा साखरेच्या भावात वाढ झाली आहे. तसेच मजुरांची मजुरी देखील वाढली आहे. त्यामुळे यंदा साखरगाठींची दरवाढ करावी लागली, असल्याची माहिती व्यावसायिक सतीश पिसाळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. सोलापूर शहरातील शुक्रवार पेठ येथे पिसाळ यांचा साखरगाठ तयार करण्याचा लघुउद्योग आहे. हा व्यवसाय वडिलोपार्जित असल्याने सतीश पिसाळ हे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह या व्यवसायात आहेत. मागणी वाढल्याने महिला आणि पुरुष मजुरांची संख्या वाढवण्यात आली आहे. जवळपास 10 महिला आणि 7 ते 8 पुरुष येथे साखरगाठी तयार करण्याचे काम करतात.

शुक्रवार पेठेत दोन ते तीन पिढ्यांपासून साखरगाठीचे काम : सोलापूर शहरातील शुक्रवार पेठ या भागात दोन ते तीन पिढ्यापासून साखरगाठी तयार करणारे अनेक कुटुंब आहेत. शुक्रवार पेठेच्या आजूबाजूला मोठ्या बाजारपेठा आहेत. मंगळवारी बाजार, बाळीवेस, मधला मारुती बाजारपेठ, कोंतम चौक बाजारपेठ या ठिकाणी उस्मानाबाद, लातूर, गुलबर्गा, विजापूर या जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी येतात. म्हणून शुक्रवार पेठेतील साखरगाठीला अधिक मागणी आहे. याठिकाणी दोन ते तीन पिढ्यापासून हे काम केले जाते. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक याभागात देखील सोलापूरचे साखरगाठी प्रसिद्ध असून इतर ठिकाणी देखील विक्री केले जाते.

साखरेच्या भावात वाढ : मागील वर्षी पेक्षा यंदा साखरेचा भाव वाढला आहे. यंदा साखरगाठी साडे सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतके दर झाले आहे. या गाठींची बाजारपेठमध्ये किरकोळ दर पाहिला असता प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये इतके झाले आहे. दरवाढ किंवा इंधन दरवाढ झाल्याने साखरगाठीत देखील भरमसाठ वाढ झाली आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis : कोरोनाकाळात मुंबईकरांची लूट झाली - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Mar 27, 2022, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.