सोलापूर - कालीचरण महाराज हे सोलापूर दौऱ्यावर ( Kalicharan Maharaj on solapur tour ) आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली आहे असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले ( Kalicharan Maharaj About Raj Thackeray ) आहे. भोंग्यांबाबत राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे, आणि त्याला संपूर्ण पाठिंबा आहे, असे कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj ) म्हणाले.
कालीचरण महाराज यांचा सोलापूर दौरा - कालीचरण महाराज सोलापूर दौऱ्यावर आले होते. जगदंबा देवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ते सोलापूर येथे आल्याची माहिती त्यांनी दिली. सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनाअगोदर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले.
राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली - सध्या महाराष्ट्र राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. 4 मे पासून मशिदी वरील भोंगे न उतरवले असता त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आवाहन राज ठाकरेंनी केले होते. यावर कालीचरण महाराज यांनी राज ठाकरेंना संपूर्ण पाठिंबा असल्याची माहिती दिली.व राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली असे सांगितले. राज्यात लवकरात लवकर हिंदू हितेशी कायदे बनले पाहिजेत. असेही यावेळी ते म्हणाले.
हेही वाचा - Sanjay Raut Criticized BJP : भाजपने चांगल्या व्यंगचित्रकारांचे हात कलम केले - संजय राऊत