ETV Bharat / city

Bhim Army Warn Raj Thackeray Aurangabad Sabha : औरंगाबादेतील राज ठाकरेंची सभा उधळून लावू; भीम आर्मीचा इशारा - भीम आर्मीचा राज ठाकरेंना इशारा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा (Raj Thackeray Aurangabad Sabha) होणार आहे. राज ठाकरेंची ही होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा (Raj Thackeray Aurangabad Sabha Disrupt) भीम आर्मीने सोलापूर येथे दिला आहे. औरंगाबादेतील राज ठाकरे यांची सभा सर्वत्र चर्चेत आहे.

bhim army
भीम आर्मी
author img

By

Published : Apr 29, 2022, 5:35 PM IST

Updated : Apr 29, 2022, 7:17 PM IST

सोलापूर - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथे सभा (Raj Thackeray Aurangabad Sabha) होणार आहे. राज ठाकरेंची ही होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा (Raj Thackeray Aurangabad Sabha Disrupt) भीम आर्मीने सोलापूर येथे दिला आहे. हा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Bhim Army Warn Raj Thackeray) यांनी दिला आहे. कांबळे हे सोलापूर दौऱ्यावर होते. औरंगाबादेतील राज ठाकरे यांची सभा सर्वत्र चर्चेत आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशोक कांबळे - राष्ट्रीय सचिव, भीम आर्मी

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Sabha : अखेर राज ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी

सामाजिक वातावरण बिघडत आहे - राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे देशासह महाराष्ट्रातही सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरेंमुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळी माध्यमांसमोर बोलू लागली आहेत. गुढीपाडव्यानंतर आता राज ठाकरेंची महाराष्ट्र दिनी औरंगाबादला सभा होत आहे. 1 मे रोजी राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...अन्यथा घोषणाबाजी करत सभा बंद पाडू - राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलीस प्रशासनाने ठाकरेंना 16 अटी-शर्ती घालून परवानगी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या 16 अटींचे उल्लंघन राज ठाकरेंकडून सभेत झाले तर आम्ही सभेतच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन राज ठाकरेंची सभा बंद पाडू, असा इशारा भीम आर्मीने सोलापुरात दिला आहे.

हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, विविध ठिकाणी जंगी स्वागत

Last Updated : Apr 29, 2022, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.