ETV Bharat / city

सोलापूर : महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अभाविपचे निषेध

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात सोलापुरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सोलापुरातील शिंदे चौक व नवी पेठ परिसरात निषेध व्यक्त करण्यात आले. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

म
c
author img

By

Published : Sep 12, 2021, 7:39 PM IST

सोलापूर - महिलांवरील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोलापुरात निषेध व्यक्त करण्यात आला. पुण्यातील वानवडी येथे एका अल्पवयीन मुलीवर 13 नराधमांनी बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच मुंबई येथील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबरला एका महिलेवर बलात्कार झाला आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे, या घटनांचा निषेध करण्यात येत असल्याचे अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले. यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार व गृह विभाग मूग गिळून गप्प आहे का, असा प्रश्न यावेळी अभाविपच्या वतीने विचारण्यात आला. तसेच आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अभाविपचे निषेध

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोलापुरातील शिंदे चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आले. पुणे येथे झालेल्या घटनेतील आरोपींना व मुंबई येथील आरोपीस कठोर कारवाई करुन त्यांवर कडक शासन केले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा - पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी नगरसेवकाचे 'शोले स्टाईल' आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.