सोलापूर - महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सोलापूर शहराला चिटकून असलेल्या अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी थेट डीपीमधून विद्युत पुरवठा बंद केल्याने वीज बिलं भरलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसत आहे. आम्ही वीज बिलं भरलेली आहोत मग आमचा विद्युत पुरवठा का खंडित करता असा सवाल देखील शेतकरी बांधव करत आहेत.महावितरणच्या भोंगळ कारभारा विरोधात आंदोलन करू असा देखील इशारा यावेळी देण्यात आला.
सरसकट सर्वच शेतकऱ्यांना धारेवर -
शेतात असलेल्या एका डीपीमध्ये सर्वसाधारण 20 ते 25 कनेक्शन जोडलेले आहेत. यामधील 4 ते 5 शेतकरी संपूर्ण वीज बिल भरलेली आहेत. आणि काही शेतकरी हे टप्याटप्प्याने भरत आहेत. आणि काही शेतकऱ्यांची वीज बिल पूर्ण थकीत आहेत. महावितरण कार्यालयाचे वसुली अधिकारी हे ज्यांची थकीत वीज बिलं आहेत त्यांना वीज बिल न मागता सरसकट सर्वच शेतकऱ्यांना धारेवर धरत आहेत. आणि जे वेळेवर वीज बिल भरलेली आहेत, अशा शेतकऱ्यांचा देखील विद्युत पुरवठा खंडित करत आहेत.संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना तुच्छ वागणूक दिली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांचे तोंड काळं झालं, राजीनामा द्यावा - प्रसाद लाड
एक एक वीज कनेक्शन कट न करता थेट डीपीचा विद्युत पुरवठा खंडित-
महावितरण कार्यालयाने नवी शक्कल लढवत थेट डीपी मधून विद्युत पुरवठा खंडित करत आहेत.ज्याचे थकीत वीज बिल आहे त्याला न मागता, सरसकट विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. एका डीपी मधील 80 टक्के वसुली करणे हा त्यामागील उद्देश आहे.संतापलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन याबाबत विचारणा केली असता असे सांगितले जात आहे, की ,तुमच्या डीपी मधील अनेक शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरले नाही त्यांना वीज भरण्याची सक्ती तुम्ही करा अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.
कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित-
सोलापूर शहराला चिटकून असलेल्या बाळे या परिसरात अनेक शेतकरी राहावयास आहेत. आणि जवळच त्यांची शेती आहे .या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. नियमाने महावितरण कार्यालयाने 15 दिवस अगोदर लेखी सूचना द्यावी असे नियम असताना देखील थेट डीपीमधून विद्युत पूरवठा खंडित केला आहे.
पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास शेतातील उभे पीक जळून जातील-
विद्युत मोटारीच्या साहायाने शेतातील पिकांना पाणी पुरवठा केला जातो .बाळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा, टमाटे,भाजी पाला अशा पिकांची लागवड केली आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून विद्युत पूरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा देखील बंद झाला आहे. आणखीन 4 ते 5 दिवस वेळेवर पाणी न मिळाल्यास सर्व उभे पीक करपून किंवा जळून जाण्याची शक्यता आहे.
महावितरण अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे -
ई टीव्ही भारतच्यावतीने संबंधित अधिकारी अभियंता शितोळे यांच्याशी संपर्क केला असता, माझा काही संबंध नाही.माझ्या वरिष्ठांनी आदेश दिला होता .आम्ही डीपी मधून विद्युत पुरवठा बंद केला आहे. त्याबाबत महावितरण वरीष्ठ अधिकारी कैरमकोंडा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली.
हेही वाचा - महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी आनंद महिंद्रांनी सांगितला उपाय