सोलापूर - फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र गुरुवारी शहरात पाहायास मिळाले. मार्केट यार्डामध्ये नागरिकांनी भाजी खरेदीसाठी जत्रा भरवली होती. सोलापूर शहरातील विविध भाजी मार्केटमध्ये गर्दी पाहायवास मिळाली. त्यामध्ये लक्ष्मी मार्केट, होम मैदान, रेल्वे स्टेशन परिसर आदी भाजी मार्केटमध्ये फिजिकल डिस्टन्सचे तीन तेरा झाले होते.
शुक्रवारपासून सोलापूर शहरासह नजीकच्या 36 गावांमध्ये व ग्रामीण भागातील तीन नगरपालिका क्षेत्रामध्ये 10 दिवसांचा म्हणजेच 26 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 5 दिवसा आधी प्रशासनाने पूर्व कल्पना दिल्याने नागरिकांनी दहा दिवसांची तयारी केली आहे. परन्तु पालेभाज्या ताजे प्राप्त व्हाव्या यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक भाजी खरेदीसाठी व इतर साहित्य खरेदीसाठी एकच झुंबड केली होती. जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन गर्दी टाळा, असे आवर्जून सांगत असताना देखील नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडविला आहे.
आम्हाला रोगाशी लढायचं आहे; रोग्याशी नव्हे
प्रत्येकाने ही कॉलरट्यून ऐकली असेल. 72 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलवर ही कॉलर ट्यून होती. गर्दी टाळा, मास्क वापरा म्हणून प्रशासन नेहमी सांगत असताना सुद्धा नागरिकांनी या नियमाकडे पाठ फिरविली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्याचा आकडा पाहता 5 हजाराच्या जवळ रुग्ण संख्या पोहोचली आहे. तरी देखील नागरिकांना या महामारीशी देणं घेणं नाही. गुरुवारी सकाळी नागरिकांनी मार्केट यार्डा जवळ सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला होता.