पंढरपूर - पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील मतदारांकडून मतदानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले आहे. दुपारच्या सत्रामध्ये रणरणत्या उन्हामध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. दुपारी पाच वाजेपर्यंत सुमारे दोन लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया संपूर्ण होण्यासाठी सात वाजेपर्यंत अवधी असणार आहे.
Pandharpur By Election 2021: मतदारांचा उत्सफूर्त प्रतिसाद.. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान.. - पंढरपूर निवडणूक
![Pandharpur By Election 2021: मतदारांचा उत्सफूर्त प्रतिसाद.. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान.. Pandharpur-Mangalvedha constituency by polls LIVE Updates](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11432780-684-11432780-1618622296633.jpg?imwidth=3840)
18:28 April 17
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान
14:51 April 17
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत 1 लाख 13 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला आहे. सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदानांची नोंद झाली आहे. त्यात स्त्री पेक्षा पुरुषांचा मतदानाचा टक्का मोठा आहे.
12:01 April 17
सकाळी अकरा वाजेपर्यंत २० टक्के मतदान..
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी अकरा वाजेपर्यंत 20 टक्के मतदान झाले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत 65 हजार नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये वयस्कर नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत मतदानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवताना दिसून येत आहेत. अकरा वाजेपर्यंत २७ हजार महिलांनी मतदान केल्याची माहिती मिळत आहे.
10:47 April 17
सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान..
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदारांनी सहा टक्के मतदानाची नोंद केली. मात्र पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू आहे. मात्र शहरी भागात मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. सुमारे एकवीस हजार नागरिकानी मतदानाचा हक्क नऊ वाजेपर्यंत बजावला आहे.
10:47 April 17
मंगळवेढा येथे समाधान आवताडे यांनी पत्नीसह मतदान..
भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहरातील इंग्लिश मीडियम स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली अवाताडे यांनीही मतदान केले.
10:47 April 17
भगीरथ भालके यांनी पत्नी व मातोश्रींसोबत मतदानाचा हक्क बजावला..
महाविकास आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहरातील सांगोला चौक येथील नगर पलिका शाळा क्रमांक 9 येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी जयश्री भालके व भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉ. प्रणिती भालके यांनीही मतदानाचा हक्क बजावत सामान्य मतदारांना मतदान करण्याचे आव्हान केले आहे.
10:46 April 17
महायुतीचा उमेदवार विजयी होणार : समाधान आवताडे
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचा विजय निश्चित असणार रस्त्याचा विश्वास पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला तसेच कोरोना पार्श्वभूमी प्रशासनाकडून मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे मतदान प्रक्रिया सुटसुटीत झाल्याचे त्यांनी सांगितले.
10:46 April 17
मतदारांवर पूर्ण विश्वास विजय आपलाच : भगीरथ भालके
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची वर असणारे प्रेम व मतदार संघातील मतदारांचा असणारा आपल्यावर विश्वास हाच आपल्याला विजयी करेल असा विश्वास महा विकास आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार भगीरथ भालके यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे पालन करून मतदान करण्याचे आव्हान मतदारांना केले आहे.
07:04 April 17
मतदानाला सुरुवात..
पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
06:47 April 17
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; ताजे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यात सरळ लढत मतदारसंघात बघायला मिळत आहे. आजच्या मतदानासाठी पात्र असलेले साडेतीन लाख मतदार निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.
महाविकास आघाडी विरोधात भाजप सरळ लढत..
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालकेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या जागेवरील पोटनिवडणूकीसाठी 17 मार्चपासून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली तर चार एप्रिलपासून प्रचाराची सुरूवात झाली. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत मतदारसंघात बघायला मिळत आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
अपक्ष उमेदवारांनी वाढविली चुरस..
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे तसेच समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे अशा अपक्ष उमेदवारांच्या एन्ट्रीनेही निवडणूक आणखीनच चुरशीची झाली आहे. त्यामुळे आता मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साडेतीन लाख मतदार बजावणार हक्क..
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सुमारे तीन लाख 40 हजार आठशे 89 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यात एक लाख 78 हजार पुरुष मतदार आहेत तर 1 लाख 62 हजार महिला मतदारांची नोंद आहे.
मतदानासाठी 524 मतदान केंद्र..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मतदारसंघात एकूण 524 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यातील 328 मूळ मतदान केंद्र, तर 196 सहाय्यक मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आली आहे. मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1028 बॅलेट युनिट, 524 व्हीव्हीपॅट मशीन असणार आहेत.
2,552 अधिकाऱ्यांची नियुक्ती..
निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2,500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बसेस आणि 3 जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमावलींचेही पालन..
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मतदान केंद्रांवर योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल याकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गजानन गुरव यांनी दिली.