ETV Bharat / city

Solapur Fire : सोलापुरातील चाटी गल्लीतील जुन्या वाड्यांना आग; गॅस सिलेंडरच्या स्फोटाने गल्ली हादरली

author img

By

Published : Mar 22, 2022, 5:44 PM IST

Updated : Mar 22, 2022, 7:54 PM IST

सोलापूर शहरातील मुख्य बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटी गल्लीत (Chati Lane fire) शॉर्ट सर्किटमुळे जुन्या वाड्यांना भीषण आग लागली. या आगीत 5 जुने घरं जाळून राख झाली आहेत. या घरातील घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेतला. सध्या ही आग आटोक्यात आली आहे.

fire
सोलापुरातील जुन्या वाड्यांना आग

सोलापूर - सोलापूर शहरातील मुख्य बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटी गल्लीत (Chati Lane fire) शॉर्ट सर्किटमुळे जुन्या वाड्यांना भीषण आग लागली. या आगीत 5 जुने घरं जाळून राख झाली आहेत. या घरातील घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेतला. त्यामध्ये गॅस स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, पाच जुने वाडे आगीत जळून खाक झाली आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

प्रतिक्रिया देताना अधिकारी, नगरसेवक आणि नागरिक

रंगपंचमी निमित्ताने बाजारपेठ बंद ;आणि आगीचे रौद्ररूप-

सोलापुरातील मंगळवार पेठ येथे ब्रिटीश कालीन चाटी गल्ली आहे. नेहमी या ठिकाणी गर्दी असते, पण आज रंगपंचमी निमित्त बाजारपेठ बंद होती. या चाटी गल्लीत जुने वाडे आहेत. मंगळवारी दुपारी बाजारपेठमधील एका घरासमोर शॉर्ट सर्किटमुळे स्पार्क होत होता. समोरील बाजूस जुना लाकडी वाडा होता. स्पार्कचा भडका उडाला आणि लाकडी वाड्याला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि आजूबाजूच्या दोन ते तीन घरात आग पसरली.

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने बाजारपेठ हादरली-

चाटी गल्ली येथील घरात आगी पसरली. त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ताबडतोब अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. पण जुन्या काळातील लहान रस्ते असल्याने, अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर पोहोचल्या नाहीत. भीषण आगीमुळे घरात ठेवलेल्या घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेतला. यामुळे भर दुपारी गॅस स्फोटाने बाजारपेठ हादरली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. लहान लहान रस्त्यामधून वाट काढत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि पाण्याचा फवारा सुरू केला.

भीषण आगीवर नियंत्रण-

अग्निशमन दल अधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत दहा गाड्यांमधून पाण्याचा फवारा मारुन आगीवर नियंत्रण आणले. पण, आगीत जवळपास 5 जुने वाडे जळून राख झाले आहेत. यावेळी महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवें, माजी महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेवक अमित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Last Updated : Mar 22, 2022, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.