ETV Bharat / city

मंडप, केटरिंग व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी

author img

By

Published : May 23, 2021, 6:01 PM IST

लग्न समारंभ मर्यादित लोकांमध्ये होत असल्याने केवळ ठराविक पदार्थ तयार होत आहे. आर्थिक संकट सहन करावे लागत असल्याने शासनाने आम्हाला व आमच्या कामगारांना मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी माढ्यातील केटरिंग व्यवसायिकांनी केली आहे.

मंडप केटरिंग व्यवसाय
मंडप केटरिंग व्यवसाय

सोलापूर - एकेकाळी लग्नाच्या समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमात पुरुष व महिला मंडळी स्वयंपाकी म्हणून काम करीत हजारो नागरिकांना जेवू घालणारेच लाॅकडाऊनमुळे उपाशी पडले आहेत. लग्न समारंभ मर्यादित लोकांमध्ये होत असल्याने केवळ ठराविक पदार्थ तयार होत आहे. आर्थिक संकट सहन करावे लागत असल्याने शासनाने आम्हाला व आमच्या कामगारांना मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी माढ्यातील केटरिंग व्यवसायिकांनी केली आहे.

'पोटाची खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत'

केटरिंग व मंडप व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांवर कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. लग्न कार्यावर अवलंबुन असलेल्या अन्य व्यवसायिकांनाही पोटाची खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या केटरिंग व्यवसायिकांसह कामगारांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी होऊ लागली आहे.

केटरिंग व्यवसायावर संक्रांत

शहरासह ग्रामीण भागात अनेक लग्न समारंभ, वास्तुशांती, वाढदिवस, नामकरण यासह अन्य सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमास आलेल्या पाहुणे व मित्रमंडळींना स्वादिष्ट जेवण करुन ते जेवू घालणारे केटरिंग व्यवसायिक व त्यांचे कामगार मात्र पडद्याआडच असतात. हजारो लोकांच्या कार्यक्रमात स्वयंपाक तयार करण्याचे काम या वर्गाकडून होत असते. मात्र या कामगारांची साधी नोंद देखील शासनदरबारी नाही. सरकारच्या निर्देशानुसार केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभास परवानगी आहे. यामुळे साध्या आणि झटपटीत पद्धतीने लग्न उरकली जात आहेत. त्यामुळे साहजिकच घरच्याघरी मर्यादित स्वयंपाक केला जात असल्याने माढा शहरासह तालुक्यातील केटरिंग व्यवसायावर संक्रात आली आहे. शानदार पद्धतीने मंडप उभारण्यास देखील फाटा दिला जात असून केवळ एका लहान मंडपातच सर्व कार्यक्रम पार पडतो आहे. लग्न सराई असल्याने अनेकांनी साहित्याची खरेदी केली होती. मात्र आवक बंद झाल्याने निराशा झाली आहे. टाळेबंदीचा फटका केटरिंग, मंडप डेकोरेटर व्यवसायाला बसला आहे.

'शासनाने आम्हाला व आमच्या कामगारांना मदत द्यावी'

लाॅकडाऊनच्या काळात विविध कार्यक्रमासाठी घेतलेल्या ऑर्डर रद्द झाल्या असून यामुळे कामगारांमध्ये घोर निराशा झाली आहे. लग्न समारंभ मर्यादित लोकांमध्ये होत असल्याने केवळ ठराविक पदार्थ तयार होत आहे. तेही घरीच केले जात आहेत. आर्थिक संकट सहन करावे लागत असल्याने शासनाने आम्हाला व आमच्या कामगारांना मदत देण्याची गरज आहे. माढ्यातील केटरिंग व्यवसायिक बाळासाहेब सुरवसे व पिंटू मुर्शद यांनी सांगितले.

केवळ एकाच मंडपात साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत. त्यामुळे कसलाही उत्साह सध्या दिसत नाही. गतवर्षीच्या लाॅकडाऊन मधून आता कुठे सावरले असताना पुन्हा एकदा नवे संकट निर्माण झाले असून बॅंकेचे हप्ते व अन्य खर्च कसा भागवयाचा असा प्रश्न आम्हाला दररोज सतावत असल्याची प्रतिक्रिया मंडप डेकोरेटर अरुण माळी व काका कदम यांनी दिली.

हेही वाचा - 'लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.