सोलापूर - वाढत्या महागाईचा आणि गॅस दरवाढीचा विरोध करत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या ( NCP Women Wing Solapur ) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. रिकामे सिलेंडर आंदोलना ( Empty cylinder in NCP Agitaion ) ठिकाणी ठेवण्यात आले. त्याला हार घालण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकऱ्यांनी डोक्यावर लाकडे घेतली होती. आता भविष्यात गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आली आहे. केंद्र सरकारने ही देशातील महागाई, पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ रोखली नाही तर मोठे जनआंदोलन उभारणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्ष सुनीता रोटे ( NCP Women city president Sunita Rote ), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रूपा पाटील यांनी दिली आहे.
'असे' झाले आंदोलन : केंद्रातील भाजपा सरकारमुळे वारंवार महागाई वाढत चालली आहे. दिवसेंदिवस घरगुती वापरतील गॅसची किंमत वाढत चालली आहे. महागाई मुळे जनता त्रस्त झाली आहे. गृहिणींचे स्वयंपाक घरातील आर्थिक गणित कोलमडले आहेत. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी महिला पदाधिकऱ्यांनी डोक्यावर लाकडाच्या मोळी घेतल्या होत्या. घरगुती वापरतील रिकामे गॅस सिलेंडरला आंदोलना ठिकाणी हार घालण्यात आले. यावेळी विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
हेही वाचा - Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीच्या समर्थनार्थ मालेगावला धरणे आंदोलन