ETV Bharat / city

यंदाच्या दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

author img

By

Published : Nov 1, 2021, 6:45 PM IST

यंदा दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याने बाजारातही तेजी आहे आणि लोकांमध्येही दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळीतील दिवसाचे महत्व

importance of diwali days
importance of diwali days

सोलापूर - वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आणि आनंददायी आहे. इतर सर्व सण आणि उत्सवापेक्षा चार दिवसांत होणारी उलाढाल सर्वानाच आनंदी आहे. यावर्षी वसुबारस 1 नोव्हेंबर रोजी सोमवारी व धनत्रयोदशी 2 नोव्हेंबर रोजी मंगळवारी आहे. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन 4 नोव्हेंबर रोजी गुरुवारी एकाच दिवशी आलेले आहे. 5 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दिवाळी पाडवा असून 6 नोव्हेंबर रोजी शनिवारी भाऊबीज आहे. वसुबारस ते भाऊबीज यादरम्यान दिवाळीचा सण साजरा केला जातो.

यंदाच्या दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी
वसुबारस- 1 नोव्हेंबरया दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकवेळ जेवण करून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे श्लोक म्हणून पूजा करतात. या दिवशी दूध ,दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत. शहरात पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात अशावेळी गाय व वासराच्या मूर्तीची पूजा देखील करतात.धनत्रयोदशी/यमदीपूजन- 2 नोव्हेंबरअश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी होय. यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी यमदीपूजन केले जाते. घरातील अलंकार सोने नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू,लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु, म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा.नरक चतुर्दशी - 4 नोव्हेंबर नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदिखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेवरही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णाने अश्विन कृष्ण चतुर्थदशीला या नरकासुराचा वध करून स्त्रियांची मुक्तता केली होती. नरकसुराने श्री कृष्णाकडे वर मागितले की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरकचतुर्थदशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्वाचे मानले जाते.नरकचतुर्थदशीला यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाचे जीवन सुरू आहे. वेगाने चालवणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. धावपळीच्या जीवनात अनेक कारणांमुळे अपमृत्युचा संभव वाढत चालला आहे. त्यामुळे नरकचतुर्थदशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे.लक्ष्मीकुबेर पूजन - 4 नोव्हेंबरशेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील वेळा अमावस्या महत्वाची आहे,त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी अश्विनातील अमावस्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावस्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वछता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घर, दुकान झाडून स्वच्छ करून सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.लक्ष्मी पूजन मुहूर्त-4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.25 ते 3.15,दुपारी 4.40 ते 10.15,उत्तर रात्री 12.15 ते उत्तररात्री 1.50बलिप्रतिपदा(दिवाळी पाडवा) -5 नोव्हेंबर कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितले आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर होते त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम सवंत सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे आयुष्य वाढते.भाऊबीज/यमद्वितीया- 6 नोव्हेंबर रोजीनरकचतुर्थदशी, अमावस्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र, या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज देखील दिवाळीच्या सणात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे. अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवायला बोलावून त्याला ओवाळावे असे पौराणिक कथेत सांगितले आहे.हेही वाचा - Diwali 2021 : पुण्यातील 'ही' बेकरी तयार करते पर्यावरणपूरक 'चॉकलेटचे फटाके'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.