ETV Bharat / city

Sadabhau Khot : शरद पवारांकडून आपल्याला धोका; सदाभाऊ खोतांचा आरोप - sadabhau khot allegation sharad pawar

सांगोल्यात हॉटेलचालकाने सदाभाऊ खोत यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्याकडून आपल्याला धोका असल्याचा आरोप खोत यांनी केला ( Sadabhau Khot Allegation Sharad Pawar ) आहे.

sadabhau khot sharad pawar
sadabhau khot sharad pawar
author img

By

Published : Jun 17, 2022, 4:40 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस कडून आपल्याला लक्ष केले जात आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून आपल्याला धोका असल्याचा खळबळजनक आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला ( Sadabhau Khot Allegation Sharad Pawar ) आहे.

सदाभाऊ खोत सांगोल्यात आल्यानंतर अशोक शिनगारे या हॉटेलचालकाने 'उधारी द्या आणि मगच पुढच्या दौऱ्यावर जावा' असे म्हणत हुज्जत घालण्याचा प्रयत्न ( Sadabhau Khot Hotel Bill Controversy ) केला. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्या हॉटेलचाकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणावर खोत यांनी आज ( 17 जून ) सोलापुरात पत्रकार परिषद घेत, राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

सदाभाऊ खोत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'हॉटेलचालकावर अनेक गुन्हे' - सदाभाऊ खोत म्हणाले की, अशोक शिंगारे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो वाळू माफिया आहे, त्याच्या मोबाईलची कसून तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचे कोणाकोणाला फोनद्वारे संवाद साधला त्याची माहिती घ्यावी. त्यामधून त्याला शिकवणूक देणाऱ्याची खरी माहिती समोर येईल. हॉटेलमध्ये एकही कार्यकर्ता चहा पण पिला नाही. 2014 ते 2022 पर्यंत मी अनेकवेळा सांगोल्यात गेलो. पण, एकदाही हा हॉटेलचालक मला भेटला नाही. अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार आहे. सोने तस्करीसह अनेक गुन्हे त्यावर दाखल आहेत, असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

'बगलबच्यांची नावे लवकरच समोर येतील' - या प्रकरणात कोणत्या राष्ट्रवादी नेत्याचे हात आहे, असे विचारले असता सदाभाऊ यांनी म्हटलं की, लवकरच बगलबच्यांची नावे समोर येतील. चिरेबंदीचा वाडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खोत यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

हेही वाचा - Mumbai High Court : नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाचा झटका, विधानपरिषदेसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.