सोलापूर- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांच्या जयंतीचे औचित्य साधून एस के फाउंडेशनच्यावतीने ( S K Foundation Solapur ) बाबासाहेबांच्या पुतळ्यास नोटांचा हार अर्पण करत ( Money necklace offered To Ambedkar Statue ) अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध स्तरातून अभिवादन करण्यात आले. शहरातील एस के फाउंडेशनच्यावतीने युवकांनी एकत्र येत आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
रक्कम सामाजिक कार्यासाठी सुपूर्त- सर्व जाती-धर्माच्या कामगारांनी एकत्र येऊन तयार केलेला नोटांचा हार घालून अभिवादन केले. यावेळी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. याबाबत रविकांत कोळेकर व जीवन शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ही रक्कम जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या सामाजिक कार्यासाठी सुपूर्त करणार असल्याचे सांगितले. यावेळी एस के फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जय भीमचा नारा : जयंती निमित्ताने आंबेडकर चौक परिसरात जय भीमचा नारा ऐकू येत होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात नोटांचा हार अर्पण करताना एस. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर, उत्सव अध्यक्ष जीवन शिंदे, सुहास म्हात्रे, नितीन भिसे, विनोद सावंत, गौतम गायकवाड,व्यंकटेश म्हेत्रे, नितीन कोळेकर, सिध्दार्थ सोनवणे, सचिन हुवाळे, लखन ओव्हाळ,सनी गज्जम, आदर्श कांबळे, अमोल चंदनशिवे, अक्षय कोळेकर, रोहित चंदनशिवे, मनोज घोडके, श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : सोलापुरात आंबेडकर जयंतीनिमित्त फक्त 1 रुपयात 1 लीटर पेट्रोल