सोलापूर - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं अन् महाविकस आघाडी सरकार झालं. अंगात आलं ते बरंच झालं, असं विधान काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोलापुरात केले आहे.
हेही वाचा - अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, पुण्यात 'अशी' आहे तयारी
महाराष्ट्राच्या इतिहासात अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत, त्या आता घडत आहेत. महाविकास आघाडी सरकार हे संजय राऊत यांच्या अंगात आल्याने अस्तित्वात आलं आहे आणि जे झालं ते चांगलंच झालं, असं वक्तव्य सोलापूर दौऱ्यावर असताना डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
- डॉ. विश्वजित कदम यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण-
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'आजी माजी आणि भावी' या विधानावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. अनेक ज्येष्ठ नेते आपआपल्या परिने प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच विश्वजित कदम यांचं हे वक्तव्य पुन्हा नवीन राजकीय चर्चांना उधान आणतं का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- भाजपसोबत रस्त्यावरील लढाईसोबत सोशल मीडियावरील लढाई -
काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देत इंग्रजांना हाकलून दिले. तर भाजप काय चीज आहे? यांनाही सत्तेवरून पायउतार करण्यासाठी तयार राहा. आज रस्त्यावरील लढाईसोबत सोशल मीडियावरील लढाई लढायची आहे. गेली सात वर्षे भाजप देशाची फसवणूक करत आहे, असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना काँग्रेस भवन येथे केले आहे.
हेही वाचा - नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानशी संबंध; त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला विरोध- अमरिंदर सिंग