ETV Bharat / city

राज्यमंत्री बच्चू कडूंचा सोलापुरातील दिव्यांग नयनाला फोन, व्यथा ऐकून गहिवरले - प्रहार संघटनेचे अध्यक्ष, राज्यमंत्री बच्चू कडू

माढा तालुक्यातील मानेगाव येथील दिव्यांग नयना नगनाथ जोकार या विद्यार्थीनीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फोन केला आणि व्यथा जाणून घेतल्या आहेत.

दिव्यांग नयना
दिव्यांग नयना
author img

By

Published : Jul 14, 2021, 7:59 PM IST

माढा(सोलापूर) - माढा तालुक्यातील मानेगाव येथील दिव्यांग नयना नगनाथ जोकार या विद्यार्थीनीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फोन केला आणि व्यथा जाणून घेतल्या आहेत. नयनाच्या कुटुबियांना मंत्री बच्चू कडू यांचा फोन येताच ते आवाक तर झालेच शिवाय आपल्या वेदना जाणून घेत आधार देणारे समाजात कोणीतरी आहे, या भावनेने ते आनंदून गेले. मंत्री कडू नयनाशी संवाद साधत असताना ते देखील गहिवरले होते.

राज्यमंत्री बच्चू कडूंचा सोलापुरातील दिव्यांग नयनाला फोन, व्यथा ऐकून गहिवरले

घरकूल व इतर मदत देण्याची मागणी

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हाल-अपेष्टा सुरू असून दुसऱ्याच्या जागेत राहत आहे. घरकूल व इतर मदत देण्याची मागणी नयनाने केली आहे. दरम्यान, मंत्री बच्चू कडू यांनी नयनाला मदतीचे आश्वासन दिले आहे. मुंबईला भेटीला येण्याचा निरोप देखील त्यांनी कुटुबियांना दिला असून 'तिकडे यायला पैसे नाहीत' असे नयनाने म्हणताच. मंत्री बच्चू कडू यांनी मुंबईला येण्यासाठी पैसे देखील पाठवले आहेत. प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांना मंत्री बच्चू कडूंनी मुंबईला जोकार कुटूबियांना घेऊन येण्याचा निरोप देखील दिला आहे. दिव्यांग व त्यांच्या अडचणीविषयी मंत्री बच्चू कडू यांना असलेली तळमळ व आत्मियता या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आधोरिखीत झाली आहे.

कोण आहे दिव्यांग नयना जोकार?

माढा तालुक्यातील मानेगावची रहिवासी असलेली नयना जोकार. उंचीने दोन फुट, १७ वर्षीय शालेय विद्यार्थिनी, गावातील संजीवनी विद्यालयात ती शिक्षण घेते आहे. तिला शाळेत सोडण्याचे काम तिची आई करीत असून आई नयनाला कडेवर घेऊन शाळेत जाऊन तिच्या शिक्षणाची तहान भागवत आहे. नयना ही शरीराने विकलांग असून तिचे ८ किलो इतके वजन आहे. हालाखीच्या परिस्थितीत अंपगावर मात करीत तहसीलदार होऊन दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्याचे ध्येय-जिद्द तिने बाळगले आहे. तिच्या पंखांना बळ देण्याचे काम देखील समाजातील दानशूरांनी करणे ही तितकेच गरजेचे बनले आहे.

'दु:ख वेदना जाणून घेतल्याचे फार मोठे समाधान'

मला मंत्री बच्चू कडू यांचा मला फोन आल्याने मी आई, वडील आनंदून गेलोत. आमचे दु:ख वेदना जाणून घेतल्याचे फार मोठे समाधान लाभले आहे. मदत मिळवून देण्यासंदर्भात मला व कुटुंबियांना मुंबईला बोलावले असून येण्यासाठीचा खर्च देखील बच्चू कडू यांनी आम्हाला पाठवला, असे देखील नयनाने सांगितले.

हेही वाचा - समर्थकांची गर्दी : पंकजा मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.