सोलापूर- शहरातील एमआयएमचे नेते तौफिक शेख यांचे सोलापूर महानगर पालिकेचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना सतत सहा महिने गैरहजर राहिल्या प्रकरणी नगरसेवक पदावरून निलंबित करण्याचा निर्णय दिवाणी न्यायाधीश व्ही.ए.कारंडे यांनी सुनावला आहे.
एमआयएम नेते तौफिक शेख हे विजयपूर येथील रेश्मा पडेकनूर यांच्या खून प्रकरणात विजापूर येथील कारागृहात होते. जून 2019 मध्ये त्यांना अटक झाली होती. मे 2019 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभांना सतत सहा महिने ते गैरहजर राहिले होते. या प्रकरणी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी तौफिक शेख यांचे नगरसेवक पद रद्द झाले असल्याचे स्पष्ट केले होते.
आयुक्तांच्या या निर्णयाबाबत शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामध्ये गैरहजेरीचा कालावधी कोणत्या तारखेपासून धरला असा आक्षेप घेतला होता. यामुळे तत्कालीन आयुक्तांनी आदेश मागे घेऊन डिसेंम्बर 2019 मध्ये नवा आदेश पारित करत सद्सत्व रद्द केले. तौफिक शेख यांनी पून्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी उच्च न्यायालयाने दिवाणी जिल्हा कोर्टात जाण्याचे सूचित केले होते.
मनपाचे विधिज्ञ अॅड श्रीकृष्ण कालेकर यांनी युक्तिवाद मांडत रेफरन्स दाखल केला होता. यावर सुनावणी होत शेवटी दिवाणी कोर्टाने तौफिक शेख यांचे सद्स्यत्व रद्दबातल ठरविले. आता तौफिक शेख 30 दिवसाच्या आत हायकोर्टात या निर्णया विरोधात जाऊ शकतात, असा मार्ग देखील न्यायालयाने या सुनावणीवेळी सांगितला आहे.
राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्नचिन्ह
विजयपूर येथील कारागृहातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर नगरसेवक तौफिक शेख हे एमआयएम मधील सहा नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या भेटीला मुंबई येथे जाऊन आले. तौफिक शेख हे एमआयएमच्या सहा नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. परंतु कोर्टाच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी पक्षात प्रवेशावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
तौफिक यांची राजकीय कारकीर्द
- ताज सोशल ग्रुप च्या माध्यमातून राजकिय कारकीर्द सुरू
भाऊ आरिफ शेख यांना काँग्रेस कडून नगरसेवक( फॉरेस्ट परिसरात) निवडून देण्यात प्रमुख भूमिका
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक
काँग्रेस मधील वर्चस्वाने भाऊ आरिफ शेख यांना सोलापूर महापौर पदी निवड
नई जिंदगी परिसरात 2010 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकीटवरून नगरसेवक निवडणूक विजयी
2012 मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण निवडणूकित राष्ट्रवादी कडून नगरसेवक निवडणूकित पराभूत
राजकीय वर्चस्वाच्या वादातून प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांपासून दूर.
2014 साल मध्ये एमआयएम पक्षात प्रवेश
ऑक्टोबर 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या वतीने आमदारकीची तिकीट प्राप्त.
विधानसभा निवडणुकीत एमआयएम कडून शहरमध्य मध्ये प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज.निसटता पराभव
2017 मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम बहुल लोकसंख्या क्षेत्रात एमआयएमच्या 8 नगरसेवकांचा विजय.
- तौफिक शेख यांचा संशयित गुन्हेगारी प्रवास -
वर्चस्वाच्या इर्षेतून तौफिक हतुरे व तौफिक शेख यांमध्ये अनेकवेळा हाणामारी.
तौफिक हतुरे गटातील खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक
रेल्वे स्टेशन परिसर,फॉरेस्ट, नई जिंदगी, मोदी परिसरात दहशत
राजकीय निवडणुकीत अनेक हाणामारीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.
जागा, गाळे रिकामे करण्याच्या वादातून अपहरणाच्या गुन्ह्यात अटक.
2007 साली शहर व जिल्ह्यातून तडीपार
2017 साली एमपीडीए कलमानव्ये येरवडा येथील कारागृहात स्थानबद्ध
2019 मध्ये वैयक्तिक कारणावरून काँग्रेसच्या नेत्या विजापूर येथील रेश्मा पडेकनूर या महिलेच्या खून प्रकरणात संशयित व मुख्य आरोपी म्हणून अटक