सोलापूर - मुंबई बॉम्बस्फोटमधील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आली आणि त्याच्या शवाला मुंबई येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले. त्याच्या कबरीवर मोठी सजावट केल्याची माहिती समोर Yakub Memon grave beautification case आली. यामुळे राज्यभरात विरोध होऊ लागला Protests across the state against grave beautification case आहे. पण कबरीवरून समाजात द्वेष पसरविणे किंवा तेढ निर्माण करणे हे असवैधानिक Yakub Memon Grave Controversyआहे. मृत्यूनंतर त्या व्यक्तीला शव पार्थिव (मराठी भाषेतील शब्द), मयत, जनाजा (उर्दू भाषेतील शब्द) असे म्हटले जाते. तो चांगला होता की वाईट हे जिवंत असेपर्यंत होता. मृत्यू नंतर त्याबद्दल बोलून किंवा त्याच्या कबरीवरून समाजात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी. असे मत सोलापुरातील मौलाना हारिस यांनी बोलताना व्यक्त केले तसेच कबर आणि मजार यातील फरक स्पष्ट करत विश्लेषणत्मक माहिती Maulana Haris Analysis On graves and tombs दिली.
कबर आणि मजार यामधील फरक - मौलाना हारिस यांनी कबर आणि मजार यामधील फरक समजावून सांगितला आहे.कबर मध्ये एखाद्या शरीराला दफन केलेले असते.येथे काही मोजकेच नागरीक येत असतात.तर मजार म्हणजे जिथे अधिक नागरिक/लोकं जाऊन प्रार्थना करतात ज्याला दर्गाह म्हटले जाते.कबरवर जाऊन देवाकडे मृताच्या पापांची माफी देवाकडे मागणे हे नवीन नाही.याकूब मेमनच्या कबरीवर जाऊन त्याचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी श्राद्ध घालत असतील तर त्यात वाईट नाही.
मोहम्मद पैगंबर यांचा संदेश - इस्लाम धर्माचे प्रचारक मोहम्मद पैगंबर यांनी हयात असताना आपल्या अनुयायांना संदेश दिला होता की,कब्रस्तान येते जात राहावे.कारण आपल्याला देखील एकेदिवशी मृत्यू आहे,आपले शरीर देखील दफन होणार आहे.ती बाब आठवण करत रहा आणि स्वतःच्या पापांची माफी देवाकडे मागा.इतर कबरीकडे पाहून स्वतःचे कर्म चांगले ठेवा असा संदेश दिला होता.त्यामुळे मुस्लिम धर्मातील नागरीक कब्रस्तान मध्ये जात असतात .
याकूब मेमनच्या कबरीवरून सामाजिक तेढ - मौलाना हारीस यांनी माहिती देताना सांगितले की,याकूब मेमनच्या कबरीवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.कोर्टाने याकूबला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.आता त्याच्या मृत्यू नंतर सामाजिक तेढ कशाला असा सवाल उपस्थित केला आहे.