ETV Bharat / city

मार्डीच्या यमाई देवी यात्रेला सुरुवात, तुळजाभवानी देवीची मोठी बहीण म्हणून ओळख

रंगनाथ स्वामी गोसावी यांनी ८०० वर्षांपूर्वी मंदिरात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. मार्डी येथील यमाई देवी तुळजापूरच्या तुळजाभवानी आईची मोठी बहीण म्हणून ओळखली जाते.

यमाई देवी यात्रा, मार्डी
author img

By

Published : Apr 30, 2019, 10:38 AM IST

सोलापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ओळख असलेल्या यमाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावी यमाई देवीचे मंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र महिन्यात यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेला शनिवारपासून सुरुवात झाली असून एकूण चार छबिना यावेळी निघतात.

यमाई देवी यात्रा, मार्डी

मार्डी येथे यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे. रंगनाथ स्वामी गोसावी यांनी ८०० वर्षांपूर्वी मंदिरात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. मार्डी येथील यमाई देवी तुळजापूरच्या तुळजाभवानी आईची मोठी बहीण म्हणून ओळखली जाते. साक्षात आदिशक्तीच्या वास्तव्यामुळे मार्डीला शक्तीपीठांचा वारसा लाभला आहे. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर यमाई देवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविक पाळतात. गुलबर्गा जिल्ह्यातील शेडम चीतापूर जवळील रंगनाथ स्वामी गोसावी हे देवीचे निस्सिम भक्त होवून गेले.

श्री देवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार पद्मशाली समाजाचे कुलदैवत तथा महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणून मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो. तेच मारोडी म्हणजे सध्याचे मार्डी गाव आहे. भागवत ग्रंथांमध्येही मार्डीचा उल्लेख आढळतो. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो भाविक आई यमाई देवीच्या दर्शनासाठी मार्डी येथे येतात.

Intro:R_MH_SOL_01_29_MARDI_YAMAI_YATRA_S_PAWAR

मार्डीच्या यमाई देवी यात्रेला सुरुवात, तुळजाभवानी देवीची मोठी बहीण म्हणून ओळख

सोलापूर-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ओळख असलेल्या यमाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावी यमाई देवीचे मंदिर असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र महिन्यातील यात्रेला सुरुवात झाली आहे.

Body:R_MH_SOL_01_29_MARDI_YAMAI_YATRA_S_PAWAR
मार्डी या गावातील यमाई देवीचे मंदिर हे पुरातन मंदिर असून आठशे वर्षांपूर्वी या मंदिरात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मार्डी यमाई देवी ही तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची मोठी बहीण म्हणून ओळखली जाते साक्षात आदिशक्तीच्या वास्तव्यामुळे मार्डी या गावाला शक्ती पीठ यांचा वारसा लाभला आहे मराठीतील यमाई देवी देवस्थानच्या यात्रेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे यमाईदेवीच्या यात्रेमध्ये एकूण चार छबिना निघतात.
श्री देवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार पद्मशाली समाजाचे कुलदैवत तथा महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणून मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो तेच मारवाडी म्हणजे सध्याचे मार्डी हे गाव आहे मार्कंडेय ऋषी यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेली ही भूमी आहे तसेच भागवत ग्रंथांमध्येही मार्डी या गावाचा उल्लेख आढळतो तुळजाभवानी च्या दर्शनानंतर यमाई देवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविक पाहतात गुलबर्गा जिल्ह्यातील शेडम चीतापूर जवळील रंगनाथ स्वामी गोसावी हे देवीचे निस्सिम भक्त होऊन गेले रंगनाथ स्वामी गोसावी यांनी आठशे वर्षांपूर्वी मार्डी या गावात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती.
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो भाविक आई यमाई देवीच्या दर्शनासाठी मार्डी येथे येतात.

Conclusion:बाईट- शहाजी पवार, ग्रामस्थ मार्डी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.